जळगांव :- महेंद्र सूर्यवंशी ,
महाराष्ट्र राज्य मधील प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांना G20 शिखर बैठकची माहिती मिळावी त्याचप्रमाणे G20 शिखर बैठकीचे भारताला २०२३ मध्ये अध्यक्ष पद मिळाले आहे त्याच प्रमाणे अंतरराष्ट्रीय आर्थिक परिस्थितीचे गांभीर्य व महत्व समजावे असे विविध विषय विद्यार्थीदशेत विद्यार्थांमध्ये रुजू व्हावे तसेच शिक्षण विभाग जिल्हा परिषद जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम जिल्ह्यात राबवला जाणार आहे.सदर उपक्रमास उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य तसेच शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
डिजिटल प्रेस मीडिया आयोजित जिल्हास्तरीय शालेय G20 प्रश्नमंजुषाची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन होणार असून दिनांक १३/१०/२०२३ पर्यंत पुढील लिंक https://www.pressmediacouncil.org/g20quizregistration
वर नोंदणी सुरू राहील. नोंदणी झाल्यावर अभ्यासक्रम लगेचच विद्यार्थ्यांना डाउनलोड करता येईल.त्याचप्रमाणे दिनांक १५/१०/२०२३ रविवार रोजी ऑनलाईन पद्धतीने पुढील लिंक वर https://www.pressmediacouncil.org/g20schoolquiz
प्रश्नमंजुषा स्पर्धा होईल.पुढीलप्रमाणे तीन गटात परीक्षा होईल. पाचवी ते सातवी यांची प्रश्नमंजुषा वेळ ही सकाळी १०.०० वा ते सकाळी १०.४५ वा पर्यंत असेल (५० गुण) , आठवी ते दहावी यांची वेळ सकाळी ११.०० वा ते ११.४५ वाजे पर्यंत असेल (७५ गुण) त्याच प्रमाणे अकरावी ते बारावी यांची वेळ दुपारी १२.०० वा पासून १२.४५ पर्यंत असेल(१०० गुण). सर्व सहभागी विद्यार्थ्यांना ऑनलाईन ई-मेल द्वारे सहभाग प्रमाणपत्र मिळेल. दिनांक २०/१०/२०२३ रोजी अंतिम निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर होईल. शालेय G20 प्रश्नमंजुषेचा बक्षिस वितरण समारंभ हा मा.जिल्हाधिकारी यांच्या हस्ते होणार आहे व रोख पारितोषिके विद्यार्थांना मिळणार आहे. सर्व पालकांनी आपल्या पाल्याची नोंदणी करावी असे अवाहन डिजिटल प्रेस मीडिया कौन्सिलने तसेच शिक्षण विभाग जिल्हा परिषद यांनी केले आहे.
Comments