चाळीसगाव : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत डॉ. विनोद कोतकर यांनी प्रचारात आघाडी घेतली असुन त्यांनी त्यांच्या प्रचाराचा झंझावात कायम ठेवला आहे. आज सकाळी दत्त मंदिर, गणेश मंदिर येथील मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी प्रचाराची सुरवात केली. सिग्नल पॉइंट मार्गे, तहसील कचेरी, आडवा बाजार, गांधी चौक, सदर बाजार, आफु गल्ली, रथ गल्ली आदि भागात नागरीकांशी संवाद साधत डॉ. कोतकर यांनी व्यापार्यांशी हितगुज साधले. विकासाच्या दृष्टीने आपली उमेदवारी असुन खर्या अर्थाने तालुक्याला पुनर्वैभव प्राप्त करून देत आदर्शवत तालुका घडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. व्यापार, उद्योग, शेती यासोबतच शिक्षण व महिला सबलीकरण तसेच समाजात भेडसावत असलेल्या अनेकविध समस्यांबाबत आपण कायम सजग असल्याचे सांगत तालुक्याची वैविध्यपूर्ण ओळख राज्यभरात व्हावी असा तालुका घडविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे आवाहनपर आश्वासन त्यांनी मतदारांना दिले. आज सकाळी 10 वाजता निघालेल्या रॅलीत तरूणांसह महिलांची रीघ दिसुन येत होती. फुगा या निशाणीचे सर्वांनाच आकर्षण असुन सर्वत्र फुगा निशाणीची चर्चा शहरासह ग्रामीण भागात जोर धरताना दिसुन येत आहे. डॉ. विनोद कोतकर यांनी विकासाची भुमीका मतदारांसमोर ठेवत तालुक्याला सर्वार्थाने विकसित करण्याचे माझे व्हिजन असल्याचे डॉ. कोतकर यांनी सांगितले. डॉ. विनोद कोतकर यांची आई फाऊंडेशनच्या माध्यमातुन आपला समाजसेवेचा वसा कायम ठेवत महिलांच्या आरोग्य विषयक समस्यांच्या निराकरणासाठी विविध तपासण्यांची शिबीरे आयोजित केले असुन यासोबतच सामाजिक सेवेवर भर देत समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही भावना डोळ्यासमोर ठेवत त्यांनी आपले समाजकार्य डॉ. विनोद कोतकर यांनी तेवत ठेवले आहे.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments