तिरुवनंतपूरम- (वृत्तसंस्था) केरळमध्ये महिला पोलिस अधिकाऱ्यावर चाकूने हल्ला करून तिला जिवंत जाळल्याची ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. शनिवारी झालेल्या या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. आरोपी हा ट्रॅफिक पोलिस कर्मचारी असून यादरम्यान त्याचे शरीरही 50 टक्के भाजले आहे. त्यामुळे आरोपीला अलप्पूझा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. पण, सध्या तरी या घटनेचे कारण उघडकीस आलेले नाही.मीडिया रिपोर्ट्सनुसार, सौम्या पुष्करण (32) ह्या सिव्हील पोलिस अधिकारी असून त्या अलप्पूझा जिल्ह्यातील वल्लिकून्नम पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होत्या. सौम्या आपली ड्यूटी संपल्यानंतर घरी जात होत्या. यादरम्यान मावेलिक्करा परिसरात आरोपी एजाजने तिच्या कारला स्कुटरने धडक दिली. पण सौम्याने कारमधून उतरून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिच्यावर चाकूने अनेक वार केले. त्यानंतर तिच्या अंगावर पेट्रोल टाकून आग लावली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात सौम्याचा जागेवरच मृत्यू झाला. तिच्या गळ्यावर चाकूच्या हल्ल्याचे निशानसुद्धा आढळले आहेत. तसेच, घटनेदरम्यान आरोपी शिपाईसुद्धा गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सौम्याचे पती नोकरी निमित्त विदेशात राहतात आणि त्यांना तीन मुले आहेत.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments