top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

'टिकटॉक ' वर बंदी घाला ; तीन मुलांच्या मातेची उच्च न्यायालयात याचिका



(वृतसंस्था) नेटकऱ्यांची वाढती पसंती असलेल्या ' टिकटॉक ' अॅपवर बंदी घालावी अशा मागणीची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी दाखल झाली आहे . तरुण आणि लहान मुलांना ' टिकटॉक ' चे व्यसन लागत असल्याचा आरोप तीन मुलांची आई असलेल्या महिलेने केला आहे . सध्या मोबाईलप्रेमींमध्ये टिकटॉक ' हे व्हिडिओ शेअरिंग अॅप लोकप्रिय झाले आहे . या अॅपचे आकर्षण सर्व वयोगटांमध्ये असले , तरी लहान मुलांना त्याचे व्यसन मोठ्या प्रमाणात जडत असल्याचे आढळले आहे . म्हणून या अॅपवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी हीना दरवेश या गृहिणीने उच्च न्यायालयात आज जनहित याचिका दाखल केली . या याचिकेचा उल्लेख मंगळवारी ( ता . १९ ) न्यायालयात होण्याची शक्यता आहे . ' टिकटॉक ' च्या व्हिडिओमुळे झालेल्या अपघातांचा तपशील दाखल करण्याची मागणीही हीना दरवेश यांनी केली आहे . सामाजिक तेढ खतपाणी हीना दरवेश यांना तीन मुले आहेत . ' टिकटॉक ' मुळे मुलांवर वाईट संस्कार होत आहेत . या अॅपवर अश्लील , जातीवाचक , धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या व्हिडिओंचे प्रमाण अधिक असते , त्यामुळे तरुणांमधील आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे . देशात जातीय तेढ निर्माण होण्याचीही भीती आहे , असा दावा त्यांनी केला .

21 views0 comments

Comments


bottom of page