(वृतसंस्था )अनेकदा एखाद्या ठिकाणी भाजलं किंवा जळालं तर आपण बरनॉल हे मलम लावतो. अनेकदा सोशल मीडियावरही राजकीय टीका-टिपण्णी करताना बरनॉल लावा असं उपरोधिकपणे म्हटलं जातं. सध्या राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं आहे. त्यामुळेच भाजपा कार्यकर्ते संतप्त झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे अशा जळणाऱ्या भाजपा भक्तांसाठी शिवसेनेने खरोखरच्या बरनॉल मलम वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. भाजपाला डावलून शिवसेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत महाविकास आघाडी करत सरकार स्थापन केले आहे. यामुळे भाजपा कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी शिवसेनेवर टीका करण्यास सुरवात केली आहे. सोशल मीडियावर यावर रंगणाऱ्या चर्चांमध्ये अनेकदा बरनॉल लावा असं उपरोधिकपणे सांगितलं जात असतं. वसईतील शिवसेनेने मात्र प्रत्यक्षात बरनॉल मलम वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. शिवसेनेतर्फे रविवार १ डिसेंबर रोजी नवघर माणिकपूर शाखेत हा मोफत बरनॉल वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याबाबत बोलताना शिवसेनेचे उपशहरप्रमुख मिलिंद चव्हाण यांनी सांगितले की, "भाजपाचे भक्त आम्ही सत्तेमुळे आल्यामुळे आमच्यावक जळत आहेत. त्यांना खरोखरच मलम लावून शांत करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही हा मलम वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे." या दिवशी शिवसेनेचे आरोग्य शिबिर आहे. त्यामुळे राजकीय कुरघोडी करण्यासाठी शिवसेनेनेही ही संधी साधली आहे.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments