जळगाव --- देशात लॉकडाऊन काळात सर्वांनी आपल्या घरातच राहून विषाणू संसर्ग साखळी तोडायची आहे. तरी देखील अनेकांकडून भाजीपाला फळे खरेदी प्रसंगी गर्दी केली जाते मात्र या समस्येवर उपाय शोधत अतिशय अभिनव पद्धतीने जळगाव रनर्स ग्रुपतर्फे नूतन मराठा महाविद्यालयाच्या आवारात आयोजित सुरक्षित बाजार हा सोशल डिस्टन्सींगसह सर्व उपाययोजनांना लक्षात घेऊन भरविण्यात येत असून याचा राज्यभरात आदर्श घेण्याची गरज असल्याची अपेक्षा केंद्रीय पेट्रोलियम प्राकृतिक गॅस तसेच सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्टँडिंग कमिटी सदस्य खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केले. त्यांनी आज सायंकाळी पाच वाजता या बाजाराला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. जळगाव रनर्स ग्रुपतर्फे नूतन मराठा महाविद्यालयाच्या आवारात आयोजित सुरक्षित बाजार भरविण्यात आला असून याला अतिशय चांगला प्रतिसाद लाभला आहे. या बाजाराला आज खासदार उन्मेश दादा पाटील यांनी भेट दिली. खासदार उन्मेश दादा पाटील पुढे म्हणाले की सध्या लॉकडाऊन सुरू असून सर्वांनी सोशल डिस्टन्सींगसह स्वच्छतेच्या नियमांचे पालन करायचे असून या बाजारात हे सर्व नियम अगदी तंतोतंत पाळले जात आहेत.यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी फळे व पालेभाज्या खरेदी करता येणार असून या माध्यमातून शेतकर्यांच्या मालास बाजारपेठ मिळाली असल्याचे प्रतिपादन त्यांनी केली.अनेक ठिकाणी या प्रकारातील बाजार असले तरी येथे नियमांचे अतिशय उत्तम प्रकारे पालन करण्यात येत असून ते असाच ऊपक्रम जळगाव लोकसभा मतदारसंघात राबवण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन खासदार उन्मेश दादा पाटील यांनी याप्रसंगी केले.सदर प्रसंगी पारोळ्याचे नगराध्यक्ष करण दादा पवार तसेच जळगाव रनर्सचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते तर रनर्स ग्रुपचे किरण बच्छाव व ज्ञानेश्वर बढे यांनी खा.पाटील यांना या बाजाराबाबत सोशल डिस्टन्सींगचे पालन करत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाची माहिती करून दिली. या बाजारात येणार्या प्रत्येक ग्राहकाला आधी पाण्याने हात धुण्याचे निर्देश दिले जात असून नंतर सॅनिटायझरने पुन्हा एकदा हात स्वच्छ केले जातात. यानंतर इन्फ्रारेड थर्मामीटरच्या मदतीने येणार्या व्यक्तीच्या शरिराचे तापमानाचे मापन केले जाते. नंतर ग्राहकाला टोकन देऊन त्यांना खुर्च्यांवर एकमेकांपासून सुरक्षित अंतरावर बसण्याची सुरक्षा करण्यात आली आहे. टोकनच्या क्रमांकानुसार संबंधीत ग्राहकाचे नाव पुकारण्यात आल्यानंतर त्याला फळे आणि पालेभाज्या खरेदी करता येतात.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments