top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

जळगांव जिल्ह्यात हत्तीरोग दुरीकरण तपासणी मोहीम


जळगाव (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आरोग्यसेवा हिवताप व हत्तीरोग विभागाच्या सहसंचालकांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यात हत्तीरोग दुरीकरण मोहीम ( पोस्ट एमडीए ) राबविण्यात येत आहे पारोळा , एरंडोल व जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे २४ ऑक्टोबरपर्यंत ८ ते १२ रक्तनमुने संकलित केले जाणार आहे . संबंधित गावांतील ग्रामस्थांनी आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांना रक्तनमुने घेण्यासाठी सहकार्य करावे , असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . डी . एस . पोटोळे , जिल्हा हिवताप अधिकारी अपर्णा ए . पाटील यांनी केले आहे . आरोग्य कर्मचारी सर्वेक्षणासाठी आल्यानंतर आरोग्य शिक्षण प्रतिबधात्मक उपाययोजना व विकृती व्यवस्थापनाची माहिती देत असतात . त्यास आजाराबाबत माहिती सांगून नजीकच्या सरकारी रुग्णालयात रुग्णांवर करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येतात . जे अंडवृद्धी रुग्ण असतील , त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करून मोफत तपासणी व शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचेही डॉ . पाटोळे व डॉ . पाटील यांनी कळविले आहे .

16 views0 comments

Comments


bottom of page