वृत्तसंस्था:- जळगाव, दि. 6 - जिल्ह्यातील स्वॅब घेतलेल्या 43 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 39 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून चार व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भुसावळ येथील 59 वर्षीय पुरुष, अडावद, ता. चोपडा येथील 58 वर्षीय पुरुष, नेहरुनगर, जळगाव येथील 75 वर्षीय पुरुष तर अमळनेर येथील 36 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 66 इतकी झाली असून त्यापैकी तेरा रूग्णांचा मृत्यू झाला आहे तर दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments