(वृत्तसंस्था) प्रशासनाने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे जिल्ह्यात पूर्ण केले आहेत . त्यानुसार अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात जवळपास पावणेसहा लाख शेतकऱ्यांचे सुमारे चार अब्ज रुपयांचे नुकसान झाले आहे . जिल्ह्यात सर्वाधिक ९५ हजार ६२६ शेतकऱ्यांचे नुकसान भोकरदन तालुक्यात झाले असून त्याखालोखाल ९० हजार ७८७ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान जालना तालुक्यात झालेले आहे . जिल्ह्यात १९ ऑक्टोबरनंतर जोरदार पाऊस आणि अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली . त्यामुळे कापूस , सोयाबीन , मकासह अन्य पिके आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले . प्रशासकीय पातळीवर करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार जिल्ह्यात चार लाख ७७ हजार हेक्टरवरील जिरायत , तर ३३ हजार हेक्टर क्षेत्रावरील बागायत पिकांचे नुकसान झाले . १६ हजार १८२ हेक्टर क्षेत्रावरील फळपिकांचे नुकसान झाले . फळपिकांचे सर्वाधिक म्हणजे जवळपास सात हजार हेक्टर नुकसान घनसावंगी तालुक्यात झाले आहे . फळपिकांचे त्याखालोखाल जवळपास सहा हजार हेक्टर नुकसान जालना तालुक्यात झाले आहे . मोसंबी , डाळिंब , द्राक्ष इत्यादी फळपिकांचे मोठे नुकसान अतिवृष्टीने झाले आहे . प्रशासकीय पातळीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना३९ ८६ लाख रुपये आर्थिक मदतीच अपेक्षा करण्यात आली आहे भोकरदन आणि जालना या दोन्ह तालुक्यांसाठी प्रत्येकी ६१ कोटी रुपये मदतीची अपेक्षा आहे . बदनापूर ५० कोटी ९० लाख , जाफराबाद ४३ कोटी ७७ लाख , परतूर ३७ कोटी २५ लाख , मंठा ३७ कोटी २५ लाख अंबड ५१ कोटी ९० लाख घनसावंगी ५८ कोटी २२ लाख याप्रमाणे अन्य तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी शासनाकडून मदत अपेक्षित आहे .
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments