अकोला :- जिल्हा परिषद शाळांचा दर्जा वाढवा व विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांची रेकाॅर्डची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी समिती गठित करण्यात आली असून मुख्याध्यापकांना पत्र पाठवण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा दिवसं दिवस कमी हाेत चालला आहे. विद्यार्थ्यांना शाळांमध्ये चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळत नसल्याची ओरड नेहमीच असते. त्यासाेबतच विद्यार्थ्यांना शालेय पाेषण आहार सुद्धा याेग्यरित्या मिळत नसल्याच्या तक्रारी सुद्धा कायम येतात. ही बाब लक्षात घेवून जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारावा व कार्यपद्धतीत सुधारणा व्हावी यासाठी अकोल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अायुष प्रसाद यांनी अाता जिल्हा परिषदेच्या काही शाळांच्या रेकाॅर्ड तपासणीचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचे आदेश सुद्धा जारी केले आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या रेकाॅर्ड तपासणीसाठी पाच सदस्यांची समितीच गठित करण्यात अाली अाहे. यात जिल्हा प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी, पातूर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी अाणि सर्व शिक्षा अभियानाच्या लेखाधिकाऱ्यांचा समावेश अाहे. यात शाळेतील संपूर्ण रेकार्ड तपासण्या संबंधीचे पत्र सहा शाळांना पाठवण्यात अाले अाहे. यात बार्शीटाकळी तालुक्यात पिंजर, अकाेट पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या पिंपरी, खैरखेड व वडाळी सटवाई, मूर्तिजापूर पं.स.मधील कंजरा व सिरसाे येथील शाळांचा समावेश आहे. संबंधित रेकाॅर्ड तपासणीला गैरहजर राहिल्यास त्यांना अनधिकृत गैरहजर म्हणून घाेषित येणार आहे.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments