चाळीसगाव:- जीप मधून चार गाई व दोन वासरू निर्दयीपणे कोंबून कत्तलीसाठी घेऊन जात असतांना. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चाळीसगांव - कन्नड फाट्यावर वाहन अडवून त्या गायींची सुटका केली. मात्र अत्यंत निर्दयीपणे या जनावरांना या जीप मध्ये कोंबल्यामुळे एक वासराचा जीप मध्येच गुदमरून मृत्यू झाला.क्षमतेपेक्षा जास्त जनावरं कोंबुन निर्दयीपणे वाहतूक करणाऱ्या चौघांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास धुळ्याकडून औरंगाबाद कडे जाणारी MH 18 AA 6276 ही मालवाहू जीप भरधाव वेगाने जात असतांना बजरंग दलाचे कार्यकर्ते शांताराम अगोणे व दिलीप घोरपडे यांनी जीपचा पाठलाग करत रांजणगाव फाट्याजवळ पकडले. जीप मध्ये काय आहे विचारले असता दहिवद येथील गायी असून बोढरे येथे घेऊन जात आहे असे सांगितले. कार्यकर्त्यांनी जीप मध्ये पाहिले असता अत्यंत निर्दयीपणे २ गायी व २ वासरू कोंबलेल्या अवस्थेत आढळून आले.यात एका वसरुचा गुदमरून मृत्यू झाला होता. संतप्त कार्यकर्त्यांनी सदर प्रकार चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशनला कळवला. तसेच गायी,जीप,व्यापारी याना ताब्यात घेतले. शांताराम दिलीप अगोणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नारायण गोपाळ,रवींद्र गोपाळ,भिला गोपाळ,मंगेश गोपाळ यांच्या विरुद्ध चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments