top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

छातीत दुखत असल्याने माजी मंत्री सुरेश जैन तुरुंगातून रुग्णालयात दाखल


घरकुल घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुरेश जैन रुग्णालयात दाखल, चाचण्यांसाठी मुंबईला करणार रवाना प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील घरकुल घोटाळ्यातील मुख्य आरोपी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना नाशिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मध्यवर्ती कारागृहात त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांना कारागृहाच्या रुग्णवाहिकेतून तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथील जे. जे. हाॅस्पिटलमध्ये पाठवण्यात येणार असल्याची माहिती शल्यचिकित्सकांनी दिली. घरकुल घोटाळ्यात मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेले जैन यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापूर्वी त्यांची हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. कारागृहात त्यांची छातीत दुखत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कारागृह आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांना तातडीने सिव्हिलमध्ये उपचारासाठी पाठवले. येथे ईसीजी केल्यानंतर रक्तदाब वाढल्याचे निदान करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथील जे. जे. अथवा केईएम रुग्णालयात पाठवण्यात येणार असल्याची माहिती निवासी शल्यचिकित्सक डाॅ. निखिल सैंदाणे यांनी दिली. दरम्यान, घरकुल घोटाळ्यात शिक्षा लागलेल्या ४८ आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

32 views0 comments

Comentários


bottom of page