top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

चोपडा येथे मध्यरात्री बाजारपेठेत कापड दुकानाला भीषण आग!; एकाचा मृत्यू



चोपडा :- उदय अग्निहोत्री

शहरातील बाजारपेठेतील मध्यरात्री १ ते १.३० वाजेच्या सुमारास राहुल एम्पोरियम या कापड दुकानाच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यास शॉर्टसर्कीटमुळे भीषण आग लागली. या आगीमध्ये एकाचा मृत्यु झाला व उर्वरित 6 जणांना या भीषण आगेतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.चोपडा शहर पोलीस स्टेशन हद्दीतील शहरातील बाजारपेठेतील राहुल एम्पोरियम या कापड दुकानाच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यास मध्यरात्री  १ ते 0१.३० वाजेच्या सुमारास शॉर्टसर्कीटमुळे भीषण आग लागली. काही क्षणातच या आगीने रौद्ररुप धारण केले. आग लागल्याचे समजताच शहर पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तात्काळ त्याठिकाणी दाखल झाले. मात्र नगरपरिषदेची अग्निशमन यंत्रणेला त्याठिकाणी पोहोचण्यास उशिर झाल्याचे कळाले. ते दाखल झाल्यावर त्यांच्याकडून आग आटोक्यात येत नसल्याचे दिसताच पोलीसांनी वायरलेस यंत्रणेद्वारे कळवून यावल, धरणगाव, पारोळा, शिरपूर, अमळनेर व जळगांव येथून अग्निशमन दलाच्या गाड्या मागवल्या.

त्यानंतर तब्बल साडे चार तासांनी हि आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत या भीषण आगीमुळे गौरव सुरेश राखेचा(जैन) वय २७ या तरुणाचा मृत्यु झाला. व उर्वरित 6 जणांना आगेतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. यावेळी शहर पोलीस स्टेशनचे  प्रभारी अजित सावळे, पोहेकॉं. जितेंद्र सोनवणे, पोना. मधुकर पवार, नितिन कापडणे, शुभम पाटील, हेमंत कोळी, हर्षल पाटील आदिंसह इतर पोलीस कर्मचारी यांनी तातडीने बचावकार्य राबविले. त्याबरोबरच चोपडा नगरपरिषद अग्निशमन दलासह यावल, धरणगाव, पारोळा, शिरपूर, अमळनेर व जळगांव येथील दलांनी आग विझविण्यासाठी महत्वाची भुमिका बजावली. यावेळी चोपडा शहर पोलीसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. शहरवासियांनी सुद्धा यावेळी धाव घेत बचावकार्यात मदत केली. शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील, प्रविण जैन, पत्रकार लतीष जैन, सचिन सोनवणे, चेतन कानडे, सौरभ नेवे, अमर बोहरा, शिवा पाटील आदिंसह इतर शहरवासियांनी बचावकार्यात मदत केली.

 

59 views0 comments

Comments


bottom of page