( शिरपूर प्रतिनिधी श्री मयूर वैद्य)
महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील पॉलिटेक्निक कॉलेज मधील लेक्चरर श्री जयेश यशवंत भदाणे, श्री सचिन शांताराम पाटील, राहुल किशोर बडगुजर, लक्ष्मीकांत गोरख पाटील, लॅब टेक्निशियन हिरालाल गिरधर माळी, लॅब असिस्टंट मनोज रमेश कासार, इन्स्ट्रक्टर उदयकुमार शरदचंद्र अग्निहोत्री, कम्प्युटर ऑपरेटर नरेंद्र पुरुषोत्तम विसपुते, टेक्निशियन योगेश लक्ष्मण महाजन यांनी 2019 मध्ये सेवा समाप्ती आदेश देण्यात आला होता व त्यांची सेवा समिती करण्यात आलेली होती त्याविरुद्ध संबंधित कर्मचारी यांनी मा. पिठासीन अधिकारी शाळा न्यायाधीकरण नाशिक यांचे न्यायालयात एडवोकेट नितीन लक्ष्मण रायते यांच्यामार्फत अपील दाखल केलेले होते.
सदर अपिलात अंतिम युक्तीवादात अपेलंट यांच्या वतीने संस्थेचा सेवा समाप्ती आदेश बेकायदेशीर असून अपेलंट यांचे समायोजन व करता आदेश देण्यात आला तसेच सदर आदेश देण्यापूर्वी कोणतेही चौकशी न करता आदेश देण्यात आला अशा अनेक कायदेशीर मुद्द्यांवर सविस्तर व प्रभावी युक्तिवाद झाल्यानंतर मा पिठाशीन अधिकारी श्री एच.डी गरड यांनी सर्व कर्मचारी यांचे आपीले मंजूर केली आणि त्यात सन 2019 वा सेवा समाप्तीचा आदेश रद्द केला आणि संबंधित कर्मचारी यांनी संस्थेने व कॉलेजने 50% वेतन अदा करावे आणि सदर आदेशाचे पालन 40 दिवसात करावे असा आदेश पारित केला. सदर अपिलात सर्व कर्मचारी यांच्यातर्फे एडवोकेट नितीन लक्ष्मण रायते धुळे यांनी युक्तिवाद केला आणि त्यांना एडवोकेट योगेश सावळे, एडवोकेट अतुल अहिरे आणि एडवोकेट संग्राम भोसले यांनी सहकार्य केले.
सदर न्याय निर्णयामुळे संबंधित कर्मचारी यांनी आनंद व्यक्त केला व न्यायव्यवस्थेवर विश्वास दाखविला आणि सत्याचा विजय होतो अशी भावना व्यक्त केली. अशा आदेशामुळे अन्यायकारक संस्थाचालकांना चपराक बसेल असा विश्वास संबंधित कर्मचारी यांनी व्यक्त केला.
Comments