चाळीसगांव :- चाळीसगांव जि. जळगांव येथे राज्य उत्पादन शुल्काचे नुकतीच नवीन कार्यालयाची इमारत बांधण्यात आली आहे.परंतु सदर कार्यालयात कुठलेही अधिकारी व कर्मचारी कधीही हजर नसतात.कार्यालय कायम बंद असते.
चाळीसगांव शहरात गावठी दारू, धाब्यावर अवैधरित्या दारूची खुलेआम विक्री केली जाते. शहरात गावठी दारू खुलेआम विकली जाते. जळगांव जिल्ह्यात कडक उन्हाळा असून नकली गावठी दारू पिउन उष्माघाताने नागरिकांचे जीव जात आहेत. अश्या परिस्थिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे.अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या गुन्हेगारांना विभागाचे अधिकारी व कर्मचारी भ्रष्टाचार करून आश्रय देत आहे हे यातून सिद्ध होते.
क्राईम अँड करपशन कंट्रोल असोसिएशनचे अधिकारी दिनांक ३१ तारखेला कार्यालयात भेट देयला गेले असतांना १२ वाजे पर्यंत कार्यालय बंद होते.साफसफाई सुद्धा झाली नव्हती.अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता ते घरी होते.शासन संबंधित अधिकाऱ्याना घरी बसून काम करण्यासाठी खर्च करते का ? अधिकाऱ्यांनीच जर घरी बसून काम केल्यावर तालुक्यात अवैधरित्या दारूचा सुळसुळाट होणारच. क्राईम अँड करपशन कंट्रोल असोसिएशन च्या अधिकाऱ्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याच्या प्रयत्न केला परंतु त्यांच्याशी ही संपर्क होऊ शकला नाही. क्राईम अँड करपशन कंट्रोल असोसिएशन च्या अधिकाऱ्यांनी माननीय मंत्री राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य माननीय आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य तसेच अपर मुख्य सचिव राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य यांच्याशी संपर्क करून अधिकारी व कर्मचारी यांच्या विरुद्ध वरिष्ठ स्तरावर तक्रार दाखल केली व संबंधित दोषी अधिकारी व कर्मचारी यांचे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नुसार तातडीने निलंबन करून त्यांच्यावर विभागीय चौकशी करून सात दिवसाच्या आता कारवाईचा अहवाल मागविला आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लवकरच संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करू असे आश्वासन दिले आहे. कारवाई कडे तालुक्यातील सर्व नागरिकांचे लक्ष आहे.
Comments