चाळीसगांव :- सध्या चाळीसगावात उन्हाची तीव्रता वाढत असल्याने तापमानाचा पारा ४० अंशा वर गेला आहे.अश्या परिस्थितीर चाळीसगाव वीज अधिकाऱ्यांनी व कर्मचारी यांनी मनमानी पद्धतीने वीज ग्राहकानाचे वीज कनेक्शन कापून ग्राहकांना अधिकच चटका देत आहे .एक महिना विज बिल थकबाकी असेल तरी महावितरणचे कर्मचारी येऊन कुठलीही पूर्वसूचना न देता लाईन पोल वरून कट करीत आहेत. असा अजब प्रकार सध्या शहरात सगळी कडे सुरू आहे .
नेमका प्रकार काय घडला ?
चाळीसगांवात सध्या मार्च महिना अखेर मुळे सगळे शासकीय विभाग वसुली करण्यावर जोर देत आहे.महावितरण यांनी वसुलीचा सपाटा लावला आहे.सध्या चाळीसगांवतील परिस्थिती बघता यंदा पाऊस चांगला झालेला नाही. दुष्काळजन्य परिस्थिती आहे. गावातील उन्हानाचे तापमान ४० अंश सेल्सिअस आहे. तरी महावितरणचे अधिकारी यांनी आपल्या कायद्यांचा विसर पडलेला यातून दिसतो. आपला मनमानी कारभार करत छोट्या वीज ग्राहकांना नाहक मानसिक व शारीरिक त्रास देण्याचा प्रकार संबंधित अधिकारी करीत आहे. कुठल्याही वीज ग्राहकाला पूर्व सूचना न देता कायद्याचे पालन न करता ग्राहकांचा वीज पुरवठा पोल वरून खंडित करायचा त्यानंतर बेकायदेशीरपणे वीज पुनरजोडणीचा दंड ३६६ रुपये प्रति वीज ग्राहकाला संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या कडून लावण्यात आला.भर उन्हात वृद्ध माणसे ,तसेच रुग्ण यांचा विचार न करता छोट्या थकबाकीदाराना मानिसक व शारीरिक त्रास संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी दिला आहे.तसेच संपूर्ण वर्षात अश्या किती बोगस कारवाई झाल्या याची देखील सखोल चौकशी करावी अशी भावना जनतेतून प्रकट होत आहे. .हा सर्व प्रकार घडताच क्राईम अँड करपशन कंट्रोल असोसिएशनचे संचालक यांनी तात्काळ वरीष्ठ स्तरावर संबंधीत अधिकाऱ्यानं विरुद्ध तक्रार दाखल केली व एक आठवड्याच्या आता संबंधित अधिकाऱ्यांवर केलेल्या चौकशीचा अहवाल वरिष्ठ अधिकऱ्यांकडून मागविला आहे.
नेमका कायदा काय?
सहा महिन्यांचे वीज बिल थकीत झाल्यास वीज अधिनियम 2003 सेक्शन 56 नुसार वीज ग्राहकाला आधी लेखी नोटीस देणे गरजेचे आहे. त्यानंतर वीज ग्राहकाने पंधरा दिवसाच्या आत बिल न भरल्यास त्याची वीज पोल वरून कट केली जाते त्यानंतर विज ग्राहकाने पुनरजोडणी (Re Connection) चा दंड भरून व आपले लाईट बिल भरून पुन्हा वीज वितरण मंडळ वीज चालू करून देते. या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालय यांचा विरुद्ध लखनऊ डेव्हलपमेंट बोर्ड 1990चा निर्वाळा असे सुस्पष्ट करतो की संबंधित वीज ग्राहकाला अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून वीज ग्राहकाला मानसिक व शारीरीक त्रास दिल्याबद्दल विज ग्राहकाला एक लाख रुपये वीज मंडळाने नुकसान भरपाई देऊन संबंधित दंड वीज अधिकारी व कर्मचारी यांच्या पगारातून वसूल करण्यात यावा असे माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निर्वाळ्यात अधोरेखित केलेले आहे.
Comentarios