top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

चाळीसगांव वन्यजीव विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी हेतू पुरस्कर केले वन्यजीव अधिनियम १९७२ चे उल्लंघन



वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली याची गांभीर्याने दखल ; चौकशी सुरू



चाळीसगाव :- क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशनच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहिती नुसार

पाटणा देवी वन्यजीव वनविभाग चाळीसगांव जिल्ह्या जळगांव येथील जुनोने, पाटणा ,ओढरे, बोधरा बिटात फेब्रुवारी २०२३ पासून सीसीटी,सलग समतल चर आणि रस्त्याचे काम करतांना JCB या अवडज यंत्राच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर साग,धावडा,अंजन या व अन्य प्राजतीच्या मोठं मोठ्या वृक्षांना मुळापासून उपटून फेकून दिले. येथील अनेक वृक्षांवर अभयारण्यातील दुर्मिळ पक्ष्यांचे घरटे देखील होते .त्या घरट्यातील अंडी ,पिल्ले यांची हत्या तर झालीच त्याच बरोबर अभयारण्यातील अश्या पक्ष्यांचा कायमस्वरूपी अधिवासच नष्ट झाला. उपटून टाकलेल्या झाडांचे खोड ,फांद्या आणि इतरही अवशेष कोणाच्या नजरेस पडू नाही म्हणून अभयारण्यातच वेगवेगळ्या ठिकाणी हलवून JCB च्या साहाय्याने खड्डे खणून पुरून टाकले.त्याच बरोबर परिसरातील गावकर्यांना सरपण म्हणून ही दिले गेले.



                      वन्यजीव अधिनियम १९७२ नुसार अभयारण्यामध्ये JCB सारख्या अवडज मशीनच्या सहाय्याने अश्या प्रकारची कामे करण्याची परवांगीच नाही कारण अभयारण्यासह वन्यजीवांच्या जीवितासह आधीवासाला देखील मोठा धोका उत्पन्न होतो. ह्या सर्व बाबी तसेच वन कायदे आणि नियमांचे उत्तम ज्ञान असतांनाही हे केलेले कृत्य निश्चितच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बेफिकिरी अधोरेखित करते. ही गंभीर बाब लक्ष्यात येताच क्राईम अँड करपशन कंट्रोल असोसिएशनचे व्यवस्थापकीय संचालक श्री.अश्विन खैरनार यांनी

प्रधान मुख्य सचिव वन विभाग महाराष्ट्र राज्य तसेच प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) नागपूर महाराष्ट्र राज्य तसेच अपर प्रधान मुख्य संरक्षक पश्चिम विभाग मुंबई, विभागीय वन अधिकारी औरंगाबाद यांना सदर तक्रार पुराव्यानिशी सादर केली. भारतीय दंड संहिते नुसार संरक्षित क्षेत्रात असे कृत्य करणे हा दंडनीय अपराध आहे.




१) वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 कलम 27 व 29

२) भारतीय वन अधिनियम 1927 कलम 26 (1) (D) अपप्रवेश, (F) अवैध वृक्ष तोड ,66 (A) गुन्ह्यात अप्रत्यक्ष सहभाग 41  वन्य जीव अभयारण्यात ह्या सर्व बाबी लक्षात घेत वरीष्ठ सर्व अधिकाऱ्यांनी ही गंभीर बाब असून त्यावर लगेच कारवाई सुरू केली. या तक्रारीच्या चौकशी कामी विभागीय वन अधिकारी एम. बी.नाईकवाडी यांनी चौकशी समिती स्थापन केली त्यात दोन सहाय्यक वनसंरक्षक व एक वनपरिक्षेत्र अधिकारी  असून ७ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. संबंधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लवकरात लवकर कठोर कारवाई करू असे आश्वासन दिले आहे.


293 views0 comments

コメント


bottom of page