top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

चाळीसगाव येथे २० डब्यांमध्ये विलगिकरण कक्ष लवकरच होणार सुरु खासदार उन्मेशदादा पाटल यांनी केली पाहणी.


चाळीसगाव -- देशात कोरोना आजाराचा सामना करण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. देशवासियांनी आजवर अतिशय जागरूकतेने या संसर्गजन्य रोगाचा मुकाबला सुरूच ठेवला आहे तरी देखील आपत्कालीन परिस्थिती उदभवल्यास भविष्यातील उपाययोजनेच्या अनुषंगाने सुमारे वीस हजार रेल्वे डब्यांचे कोरोना विलगीकरण कक्ष निर्मितीचा निर्णय घेण्यात आला होता. या अनुषंगाने चाळीसगाव रेल्वे स्थानकाच्या धुळे बोगी यार्ड कडे एकूण वीस डब्यांमध्ये रात्र दिवस काम सुरू असून आज सायंकाळी पाच वाजता जळगाव लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार उन्मेश दादा पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी सिनियर सेक्शन इंजिनियर योगेश थोरात, परिचालन निरीक्षक एन पी बडगुजर, आर पी एफ इन्स्पेक्टर भागवत सोनवणे, बाळासाहेब सोनवणे, शेटे काका,नरेन काका जैन,समकीत छाजेड, कपिल पाटील, अक्षय मराठे,अमित सुराणा,अमोल मराठे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. वरिष्ठ अभियंता योगेश थोरात यांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांना सुरू असलेल्या कामाची माहिती दिली. वरिष्ठ पदाधिकारी पी रामचंद्रन ,जावेद असलम यांचे मार्गदर्शनाखाली चाळीसगाव येथे 20 कोचेस मध्ये "आयसुलेशन कक्ष " रूपांतरित करण्याचे कार्य योगेश थोरात सीनियर सेक्शन इंजीनियर व त्यांची 19 कर्मचारीची टीम करत आहे.

27 views0 comments

Comentarios


bottom of page