चाळीसगाव - (उपसंपादक)चाळीसगाव येथुन चोरुन नेलेली मोटारसायकल सह चोरट्यास औरंगाबाद येथुन चाळीसगाव पोलीसांनी दि २८ रोजी ताब्यात घेतले आहे.शहरातील खरजई रोडवरील पेट्रोल पंपाजवळुन पिंपरखेड ता चाळीसगाव देविदास थोरात यांची सी डी डिलक्स क्र एम एच १९ बी के १३९८ ही मोटारसायकल दि १/६/२०१९ रोजी चोरीस गेली होती. तेव्हा पासुन पोलीस चोरट्याच्या शोधात होते दि २८ रोजी औरंगाबाद सी टी चौक पोलीसांनी मंगेश हरी गौतम (२०) रा देवगाव रंगारी ता कन्नड जि औरंगाबाद यास वरील चोरीच्या मोटारसायकलसह ताब्यात घेवुन चाळीसगाव शहर पो नि विजय ठाकुरवाड, उपनिरीक्षक राजेश घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप तहसिलदार, विनोद भोई, राहुल पाटील, पो कॉ प्रविण सपकाळे यांनी आरोपीस मोटारसायकलसह ताब्यात घेतले आहे त्याचे कडुन मोटारसायकल उघडकीस येण्याची शक्यता वरतवण्यात येत आहे
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comentários