चाळीसगाव : (उपसंपादक चा.वि ) दि.४ रात्री चाळीसगाव धुळे पुलावर ओमनीचा अपघात झाला होता.यात पुलावरील संरक्षण पाईप तुटले होते व गाडी खाली पडून एकाच जागीच मृत्यू झाला होता.परंतु अजून पर्यंत चाळीसगाव नगरपरिषद तसेच वाहतूक पोलीस खाते या कडे दुर्लक्ष करतांना दिसत आहे.या पुलावर पहाटे फिरण्यासाठी तसेच संध्याकाळी फिरण्यासाठी वयोवृद्ध ,महिला तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी व शाळेतील मुलं जात येत असतात. यामुळे पुन्हा जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण पुलाच्या खाली रेल्वे रुळांचा कारखाना आहे. कोणीही व्यक्ती मूल वयोवृद्ध यांचा अंधारात तोल जाऊ शकतो. तसेच काली पिली गाडी,बसेस ह्या पुलाच्या मधोमध उभे असतात यामुळे पण तिथे पुन्हा अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता आहे. टोल वाचवण्यासाठी मालवाहतूक ८ चाकी १० चाकी १२ चाकी ह्या ट्रक सुद्धा गावात प्रवेश करून त्याच पुलावरून जातात. ह्या सर्व प्रकाराकडे चाळीसगांव नगरपरिषद व वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष आहे.यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी याची सर्व स्थरातून मागणी होत आहे.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments