चाळीसगांव:- (उपसंदक चा.वि) शहरातील काही मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थानी शाळा प्रवेशाचा घाऊक बाजार मांडला आहे.एकीकडे प्रवेश पूर्ण दाखवून प्रत्यक्षात एका प्रवेशासाठी वेगवेगळ्या संस्थांनी १० हजार ते २५ हजार रुपयांची बोली तथाकथित शिक्षण सम्राटांनी लावल्या आहेत.अनेक संस्थांना शासकीय अनुदान असूनही संस्थाचालकांनी जना मनाची लाज सोडून हा प्रवेशाचा बाजार मांडला आहे.या भयंकर प्रकारामुळे सामान्य जनतेची चांगलीच पिळवणूक होत आहे.शिक्षण हक्क कायद्याच्या २५%आरक्षणानुसार प्रवेशाच्या शिक्षण संस्थांनी चिंध्या केलेल्या दिसतात.दिवसाढवळ्या पालकांच्या खिश्यावर दरोडा पडत असताना यावर कोण कारवाई करेल असा सूर शहरातून उमटत आहे.आपल्या पाल्याला उत्तम दर्जाचे शिक्षण आणि चांगल्या शिक्षण संस्थेत मिळावं ही प्रत्येक पालकांची इच्छा असते.परंतु ही गोष्ट आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलेली नाही.अजून यंदाचे शैक्षणिक पर्व सुरू होण्यास दहा दिवस शिल्लक आहे.परंतु काही शिक्षण संस्थान मध्ये प्रवेश कधीच फुल्ल झाला आहे असे ह्या संस्था भासवत आहे.पालकांच्या खिश्यावर दरोडा पडूनही आपल्या पाल्याच्या भवितव्यासाठी संस्थाचालकांची मुजोरगिरी मूक गिळून सहन करत आहे.या प्रकारावर शिक्षण विभाग काहीही कारवाई करत नाही असे बोलले जाते परंतु प्रवेशाच्या नावाखाली शाळेतून डोनेशन घेतले जात असल्याची तक्रार कोणी करत नाही.६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास मोफत शिक्षण व सक्तीचे प्राथमिक शिक्षण असलेला कायदा १ एप्रिल २०१० पासून लागू झाला आहे.सर्व खाजगी शाळांमध्ये २५% गरीब कुटुंबातील मुलांसाठी राखीव जागा ठेवणे बंधनकारक आहे.डोनेशन कॉपीटेशन असे कुठलेच शुल्क आकारण्यास सक्त मनाई आहे.परंतु विना अनुदानित शाळांना पालकांकडून डोनेशन घेता येते.शैक्षणिक साहित्य शाळांनी निश्चित केलेल्या दुकानदारांकडून आग्रह धरणे बेकायदेशीर आहे.असे आदेश संबंधित शिक्षण संस्थांना शिक्षण विभागाकडुन देणें आवश्यक असताना नेमके शिक्षण विभागच गप्प असल्यामुळे ही कारवाई कोण करेल हा प्रश्न आहे.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments