top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी सरदारशेठ राजपूत तर उपसभापती पदी किशोर भिकनराव पाटील


चाळीसगाव – (वार्ताहर) बाजार समितीमध्ये येणारा प्रत्येक शेतकरी आपले दैवत आहे, या दैवताची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळाली असून सद्यस्थितीत अडचणीत असलेल्या बळीराजाला आधार देणे गरजेचे आहे. पोटाला चिमटा देऊन शेतकरी मोठ्या अपेक्षेने बाजार समितीत येतो. त्यांच्या सोयीसाठी येत्या आठवड्याभरात सहकारमहर्षी स्व.रामराव जिभाऊ पाटील यांच्या नावाने अन्नपूर्णा योजना कार्यान्वित करण्यात येऊन नाममात्र 10 रुपयात शेतकऱ्यांना दर्जेदार असे पोटभर जेवण दिले जाईल तसेच उद्याच हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब यांच्या नावाने कृषी वाचनालय उद्घाटन करणार असल्याची घोषणा आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी यावेळी केली. चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडीमध्ये भाजपा – सेना प्रणित सहकार पॅनलचे सरदारशेठ राजपूत यांची सभापती पदी तर उपसभापती पदी किशोर भिकनराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी सदर निवडी साठी पुढाकार घेतला होता. यावेळी त्यांच्याहस्ते नूतन सभापती - उपसभापती यांचा सत्कार करण्यात आला. पुढील काही महिन्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचा अमृतमहोत्सव भव्य स्वरूपात साजरा केला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष के बी साळुंखे, बाजार समितीचे माजी सभापती रविंद्र आबा पाटील, माजी उपसभापती महेंद्रबापू पाटील, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, आरपीआय जिल्हाध्यक्ष आनंद जी खरात, जेष्ठ संचालक मच्छिंद्रभाऊ राठोड, धर्मा बापू काळे, विश्वजित भैय्या खैरनार, शिरीष जगताप, सौ.अलकनंदा धर्मराज भवर, सौ.शोभाबाई आबा पाटील, आर.एल. नाना पाटील, बाळासाहेब वाबळे, तालुका सरचिटणीस प्रा.सुनील निकम, अनिल नागरे, शहर सरचिटणीस प्रशांत पालवे, अमोल नानकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रोहन सूर्यवंशी, भाजपा तालुका उपाध्यक्ष कपिल पाटील, बंजारा सरपंच संघटनेचे साहेबराव राठोड, डॉ.महेंद्र राठोड, किशोर पाटील ढोमणेकर, प्रज्ञावंत आघाडीचे रमेश सोनवणे, अनुसूचित जमाती आघाडीचे स्वप्निल मोरे, नगरसेवक बापू अहिरे, सौ.विजयाताई प्रकाश पवार, माजी पं.स.सदस्य सतीश पाटे, माजी नगरसेवक अविनाश चौधरी, निलेश महाराज राजपूत, भटके आघाडीचे सुदाम चव्हाण, कार्यालयमंत्री अरुण पाटील, राजेंद्र पगार, कैलास पाटील, ज्ञानेश्वर पाटील, निवृत्ती कवडे, भैय्यासाहेब पाटील, जमादार पाटील यांच्यासह भाजपा – सेना पक्षाचे पदाधिकारी – कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

77 views0 comments

Comments


bottom of page