(वृतसंस्था) घरातल्या प्रयोगशाळेतच मेफेड्रोन अर्थात एमडी ड्रग्जनिर्मिती होत असल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका संशोधकासह त्याच्या साथीदाराला क्राइम ब्रँचच्या पथकाने अटक केली असून, संशयितांकडून तब्बल एक कोटी ८० लाख ४७ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या दोघांनी घरातच एमडी ड्रग्ज निर्मितीचा उद्योग सुरू केला होता. पोलिसांनी आतापर्यंत या गुन्ह्यात सात जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून तीन कोटी २० लाख रुपयांचे २५ किलो ड्रग्ज हस्तगत केले आहे. अरविंद कुमार (वय ३४, मुंबई) आणि हरिश्चंद्र उर्वादत्त पंत (२४, रा. बोईंसर, ठाणे) अशी या संशियितांची नावे आहेत. अरविंद कुमार एम.एस्सी. (ऑरगॅनिक केमिस्ट्री) झाला असून, तो मूळचा उत्तर प्रदेशातील मुज्जफरनगर येथील आहे. शिक्षणानंतर नोकरीसाठी तो मुंबईत आला. येथे त्याने १० वर्षे वेगवेगळ्या औषधनिर्मिती कंपन्यांमध्ये काम केले. शेवटची नोकरी सोडली त्या कंपनीत तो सहाय्यक संशोधक शास्त्रज्ञ म्हणून काम करीत होता. नोकरीत मनासारखे पैसे मिळत नसल्याने अरविंद कुमारने बी.एस्सी.चे शिक्षण अर्धवट सोडलेल्या पंतला सोबतीला घेऊन एमडी ड्रग्जनिर्मितीचा धंदा सुरू केला. मागील तीन वर्षांपासून ते ड्रग्जची बेमालूमपणे निर्मिती करीत असल्याची माहिती प्राथमिक चौकशीत समोर आल्याचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comentários