(वृत्तसंस्था) बेलापूर येथील सेक्टर ८ भागात घोरपडीची शिकार करण्याऱ्या एकाला वन विभागाने नुकतीच अटक केली आहे . सुभाष देवजी राठोड ( ३२ ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून घोरपडीच्या शिकारीची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर त्याला अटक केल्याची माहिती वन विभागाने दिली . घोरपडीच्या शिकारीची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती . वनक्षेत्रपाल नरेंद्र मुठे यांच्या पथकाने चित्रफितीची सखोल चौकशी केली असता हा प्रकार सेक्टर ८ मधील दुर्गामातानगर येथील असल्याची माहिती मिळाली . या माहितीच्या आधारे वन विभागाने सुभाष देवजी राठोड याला दुर्गामातानगर परिसरातून ताब्यात घेतले . त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली . याप्रकरणी वन विभागाने त्याला अटक केली आहे त्याच्यासोबत असलेल्या इतर दोघांचाही वन विभाग शोध घेत आहे.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
コメント