दिल्ली:- भारताच्या पूर्व विदेश मंत्री सुषमा स्वराज यांचे निधन झाले. १०.४५ मिनीटांनी एम्स रुग्णालयात त्यांची प्राण ज्योत मावळी. बीजेपीला खूप मोठ्ठा धक्का. १९५२ ते २०१९
माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं हृदय विकाराच्या धक्कानं निधन झालं आहे. छातीत वेदना होत असल्यानं त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. त्या ६७ वर्षांच्या होत्या. मोदी सरकार १ मध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून काम करताना स्वराज यांनी त्यांच्या कामानं छाप पाडली होती. तीन तासांपूर्वीच स्वराज यांनी ट्विट करुन काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याबद्दल मोदी सरकारचं कौतुक केलं होतं. त्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले होते. या क्षणाची आपण आयुष्यभर वाट पाहत होते, असं स्वराज यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर काही वेळातच स्वराज यांची प्रकृती नाजूक असल्याचं वृत्त आलं. त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हर्षवर्धन त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर थोड्या वेळातच त्यांचं निधन झालं
Comments