चाळीसगाव - तालुक्यातील भऊर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिक सुनंदा श्रीराम कुमावत यांना त्या शाळेत कार्यरत असतांना गावातील काही लोकांनी शाळेत येवून शिवीगाळ करून जीये ठार मारण्याची धमकी दिली . याबाबत सौ सुनंदा कुमावत यांनी गटशिक्षणाधिकारी , पंचायत समिती , चाळीसगाव यांच्याकडे तक्रार अर्ज केला आहे . शिवीगाळ व दमाबजीच्या प्रकारानंतर मुख्याध्यापिका कुमावत यांची प्रकती बिघडल्याने त्यांनर मेहणबारे ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते मुख्याध्यापिका कुमावत यांचे म्हणणे आहे की , दि . १८ रोजी शाळेत दोन मुलींचे आपसात भांडण झाले . त्यातील एका घरी जावून आपल्या पालकांना बोलावून आणले . या पालकाने शाळेत आल्या आल्या शिक्षकांना शिवीगाळ केली . शिक्षकांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुख्याध्यापिका सौ . सुनंदा कुमावत यांनी मेहूणबारे पोलीसांकडे तक्रार केली आहे . असा प्रकार गेल्या दोन महिन्यापासून सुरू असून शिक्षकांना शिकवणे कठीण झाले आहे असे कमावत यांचे म्हणणे आहे . पोलीसांना दिलेल्या तक्रारीत त्यांनी संबंधीतांवर कारवाईची मागणी केली आहे . आता गटशिक्षणाधिकारी यावर के कारवाई करतील या कडे शिक्षकांचे लक्ष आहे. गटशिक्षणाधिकारी चाळीसगांव यांनी यावर त्वरित कारवाई करावी अशी शिक्षकांची मागणी आहे.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments