(वृत्तसंस्था) गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी श्वसनास त्रास झाल्यानंतर लता मंगेशकरांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथे त्यांच्यावर डॉक्टर उपचार करत आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून चिंता करण्याचं कारण नसल्याचं सांगितलं जात आहे.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
コメント