top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

गुजरातेत स्टिंगमधून दारू डिलिव्हरीच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश


(वृतसंस्था) बार्डोली (गुजरात):-पूर्णत: दारूबंदी असलेल्या गुजरातेत झाेमॅटो-स्विगीचे काही डिलिव्हरी बॉय बिनधास्तपणे दारूचे ‘पार्सल’ आणूत देत आहेत. हे डिलिव्हरी बॉय घरच नव्हे रुग्णालये, पोलिस ठाण्यापर्यंत तळीरामांची ‘ऑर्डर’ पूर्ण करत आहेत. कुणाला संशय येऊ नये म्हणून ते ‘ही घ्या तुमची व्हेज बिर्याणी’सारखे कोडवर्ड वापरून दारूची डिलिव्हरी करतात. दारूची बाटली आणून देण्यात भीती वाटत नाही का, या प्रश्नावर झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय आपली बॅग दाखवत म्हणाला, ही किट आहे ना! आपल्या कंपनीच्या परस्परच हे बॉय हा अवैध धंदा करत असल्याचा संशय आहे. ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉयचा पर्दाफाश करण्यासाठी गुजरातेतील काही शहरांत ऑक्टोबर ते नोव्हेंबरदरम्यान महिनाभर स्टिंग ऑपरेशन केले. यासाठी घर, पोलिस ठाणे, रुग्णालयांसारख्या सार्वजनिक स्थळीही दारूची ऑर्डर दिली. ती या डिलिव्हरी बॉयने पूर्ण केली. झोमॅटो-स्वीगीच्या गणवेशामुळे पोलिसांना संशय येत नाही या स्टिंगनुसार झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयने पहिली ऑर्डर दिली. घरी दारुची बाटली पोहोचवली. या वेळी एका डिलिव्हरी बॉयने दावा केला की, सुरत असो की बार्डोली, हॉस्पिटल असो वा कॉलेज, जेथे हवे तेथे दारुची डिलीव्हरी देऊ. झोमॅटो आणि स्वीगीचे गणवेश असल्याने पोलिसांना या मुलांवर संशय येत नाही. म्हणूनच या मुलांनी चक्क दारु पोहोचवण्याचे काम करत अवांतर कमाईचा हा एक स्रोत तयार केला आहे. यात डिलिव्हरी कंपनीचा थेट सहभाग नसतो.

27 views0 comments

Commentaires


bottom of page