top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

खरतंर ती वादळापूर्वीची शांतता होती. पडद्यामागे बरच काही घडून गेले होते.


महाराष्ट्रच्या राजकारणात एका नव्या राजकीय समीकरणाचा उदय झाला आहे. पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच उभी फूट पडली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शनिवारी सकाळी टीव्हीवरच हे दृश्य पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.महाराष्ट्रात घडलेल्या या मोठया राजकीय घडामोडीनंतर केंद्रीय गृहमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना भारतीय राजकारणाचे चाणक्य असल्याची उपमा भाजपाने दिली आहे. अमित शाह यांनी पुन्हा एकदा भारतीय राजकारणामधील आपण चाणक्य असल्याचे सिद्ध केले आहे असे टि्वट बिहारचे भाजपाचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी केले आहे. नेमकं अमित शाहंनी काय केलं काल रात्री आठच्या सुमारास महाविकास आघाडीची बैठक संपली. या बैठकीतून बाहेर पडताना शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर सहमती झाल्याचे विधान केले. उद्धव ठाकरेंनी सुद्धा चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती दिली. त्यानंतर रात्री अचानक एकाएकी असे काय घडले? देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र कसे आले? हा प्रश्न अनेकांना पडला असेल.- राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेनेची सत्ता स्थापनेसाठी दररोज चर्चा सुरु होत्या. नेमकं त्यातून काही निष्पन्न होताना दिसत नव्हतं. मीडियाचं संपूर्ण लक्ष या तिन्ही पक्षांकडे केंद्रीत झालेलं असताना भाजपा पूर्णपणे शांतता होती.- खरतंर ती वादळापूर्वीची शांतता होती. पडद्यामागे बरच काही घडतं होतं. पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी त्यांचे निकटवर्तीय, विश्वासू सहकारी भूपेंद्र यादव यांना गपचूपपणे मुंबईत पाठवलं.- मध्यरात्रीच्या सुमारास देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये सत्ता स्थापनेसंबंधी एकमत झालं. काही मिनिटात अमित शाह यांना फोन करुन दोन्ही नेत्यांमध्ये काय ठरलं त्याची माहिती देण्यात आली.- रात्री २ वाजता देवेंद्र फडणवीस, भूपेंद्र यादव आणि अजित पवार यांच्यात मुंबईमध्ये चर्चा सुरु होत्या. त्याचवेळी दिल्लीत अमित शाह जागे होते. महाराष्ट्रात सरकार स्थापनेपूर्वी घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर त्यांचे अत्यंत बारीक लक्ष होते. - रात्रीच्या वेळीच महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या सचिवांना राष्ट्रपती राजवट हटवण्यासंबंधी पावले उचलण्यास सांगण्यात आले.- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपाला सकाळी ६.३० वाजताच देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधीचा कार्यक्रम करायचा होता. पण सकाळीच शपथविधी शक्य असल्याचे भाजपा नेतृत्वाला कळवण्यात आले. तास-दीड तास थांबावे लागेल हे भाजपाला सांगण्यात आले.- सकाळी ५ वाजून ४७ मिनिटांनी राष्ट्रपती राजवट हटवण्यात आल्यानंतर सकाळी ८ वाजून ७ मिनिटांनी देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

45 views0 comments

Yorumlar


bottom of page