top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

खड्यांमुळे जखमी युवकाची महापौरांविरुद्ध पोलिसात धाव



नागपूर , ता . २३ : महापालिकेसह शहरात रस्ते असलेल्या विविध संस्थांनी खड्डे बुजविण्यास प्रारंभ केला असला तरी अनेक भागांत दुचाकीधारकांत खड्यांची दहशत कायम आहे . फ्रेण्डस कॉलनी येथील एका खड्यातून वाहन उसळल्याने जखमी झालेल्या तरुणाने चक्क महापौर नंदा जिचकार , फ्रेण्डस कॉलनीतील नगरसेवक , महापालिकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गिट्टीखदान पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला . लक्ष्मीनगरातील रहिवासी राजीव रंजन सिंग दुचाकीने रविवारी सायंकाळी फ्रेण्ड्स कॉलनीतील मित्राकडे जात होते . आकारनगर ते फ्रेण्ड्स कॉलनी रस्त्यावरील खड्डयांना बगल देताना ते दुचाकीसह रस्त्यावर कोसळले . हेल्मेट घातल्यामुळे डोके बचावले , मात्र त्यांच्या डाव्या पायाला चांगलीच दुखापत झाली . या रस्त्यावर अनेक खड्डे असून रात्री नऊच्या सुमारास फ्रेण्ड्स कॉलनी घाटाजवळ पडल्याचे राजीव रंजन सिंग यांनी नमूद केले . आमदार सुधाकर देशमुख यांच्या घरापासून १०० मीटर अंतरावर हे खड्डे आहेत , अशी पुस्तीही त्यांनी जोडली . या घटनेसाठी महापौर नंदा जिचकार , फ्रेण्डस कॉलनीतील नगरसेवक , आमदार सुधाकर देशमुख जबाबदार असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी गिट्टीखदान पोलिस स्टेशन गाठून महापौर नंदा जिचकार आमदार , नगरसेवक व मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली गिट्टीखदान पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय अढाऊ यांनीही तक्रार आल्याचे नमूद केले .

15 views0 comments

Comments


bottom of page