top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

खाजगी शिकवण्या बंद होणार ; शिक्षण संस्थां व शिकक्षकांवर कारवाईचा इशारा


चाळीसगांव :-(उपसंपादक) चाळीसगाव तालुक्यासह शहरातील शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक सर्रासपणे खाजगी शिकवण्या घेत आहेत.बहुतेक विध्यार्यांच्या पालकांची आर्थिक परिस्तिथी योग्य नसल्यामुळे त्या विध्यार्थ्यांना वर्गात शिक्षक दुजाभाव देतात. बऱ्याच पालकांची इच्छा नसतांना सुद्धा जबरदस्तीने वर्गातले काही शिक्षक त्यांना आग्रह करतात.ह्या शिक्षकांना शासनाचा पगार असतांनाही की अवाजवी फी आकारून पैसे घेतात.त्यामुळे पालकांच्या आर्थिक भुर्दंड भोगावा लागतो आहे.शहरातील शिक्षक हे आपल्या नातेवाईक यांच्या नावावर शकवण्या चालवतात.शहरातील अनेक नामांकित शिक्षण संस्थांमधील शिक्षक सर्रासपणे खाजगी शिकवण्या घेत आहे.या संदर्भात पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे अनेक पालकांसह काही सामाजिक संस्थांनी व संघटनांनी तक्रारी केल्या असून खाजगी शिकवण्या घेणाऱ्या शिक्षकांवर कारवाईची मागणी केली आहे.प्राप्त तक्रारीनुसार गटशिक्षणधिकारी यांनी १५ शाळा,महाविद्यालय व त्यांच्या शिक्षकांना शिकवण्या बंद करण्यासंदर्भात पत्र दिले आहे. ज्या शिक्षण संस्थेचे शिक्षक शिकवणी बंद करणार नाही त्यांचे अनुदान बंद करून मान्यता रद्द करण्याचा प्रस्थावही वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात येईल. मागच्या वर्षी पण हेच पत्र दिलेले असतांनाही शिकवण्या सर्रास सुरूच आहे त्यामुळे यावर्षी गटशिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या पत्राचा कितपत परिणाम होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ह्या शाळांना दिले पत्र आनंदीबाई बंकट मुलाचे व मुलींचे हायस्कूल,राष्ट्रीय विद्यालय,राष्ट्रीय मुलींची शाळा, अभिनव हायस्कूल, डॉ.काकासाहेब पूर्णपत्रे माध्यमिक विद्यालय, व्ही.एच.पटेल प्राथमिक विद्यालय, एच.एच.पटेल प्राथमिक विद्यालय,के.आर. कोतकर ज्युनियर कॉलेज, तात्यासाहेब सामंत विद्यालय,जयहिंद महाविद्यालय,चिंचगव्हाण माध्यमिक विद्यालय

28 views0 comments

Comentários


bottom of page