(शिरपूर प्रतिनिधी: मयुर वैद्य) किसान विद्या प्रसारक संस्थेच्या मैदानावर शालेय तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेत मुलांच्या गटात एकूण 25 संघानी सहभाग घेतला होता.
स्पर्धेचे उद्घाटन किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री तुषार जी रंधे, क्रीडाप्रमुख श्री मनोज पाटील, तालुका संयोजक श्री राधेश्याम पाटील, प्रा राहुल स्वर्गे श्री राकेश बोरसे क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक यांच्या उपस्थितीत करण्यात आले स्पर्धेतील विजयी संघ पुढीलप्रमाणे
मुले विजयी संघ:-
१४ वर्ष आतील- ए आर पटेल सीबीएसई शिरपूर.
१७ वर्षा आतील आरसी पटेल मराठी माध्यमिक विद्यालय शिरपूर
१९ वर्ष आतील- आर. सी पटेल इंग्लिश मीडियम ज्युनिअर कॉलेज शिरपूर.
स्पर्धा यशस्वीतेसाठी संस्थेचे क्रीडा शिक्षक श्री राकेश बोरसे सचिन कुमावत दीपक पवार यांनी परिश्रम घेतले.किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री तुषार जी रंधे यांनी सर्व विजयी संघांचे अभिनंदन केले.
Comentarios