सोलापूर : (वृत्तसंस्था )शासनाने राज्यातील कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी देण्याचे नऊ ऑक्टोबरला जाहीर केले होते पण , आज पुन्हा एक पत्र काढून कोशागारातील कर्मचाऱ्यांच्या सेवा विधानसभा निवडणुकीसाठी वर्ग होत असल्याचे कारण सांगून कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी देणे शक्य होत नसल्याचे सांगितले आहे . त्यामुळे राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आता दिवाळीनंतरच होणार आहे . राज्यात दिवाळीची सुरवात २५ ऑक्टोबरपासून होणार आहे . त्यामुळे शासनाने राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन २४ ऑक्टोबरपूर्वी देण्याचा निर्णय नऊ ऑक्टोबरला घेतला होता . पण , निवडणुकीच्या कामकाजासाठी कोशागार कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवा वर्ग करण्यात आल्या आहेत . त्यामुळे कोषागार कार्यालयात मनुष्यबळाची कमतरता जाणवणार आहे . मनुष्यबळाअभावी ऑक्टोबरचे वेतन २४ ऑक्टोबरपूर्वी करणे शक्य होणार नसल्याचे निदर्शनास आले आहे . त्यामुळे यापूर्वी नऊ ऑक्टोबरला घेतलेला निर्णय स्थगित करण्यात येत असल्याचे पत्र लेखा व कोशागरचे संचालक ज . र . मेनन यांनी राज्यातील जिल्हा कोशागार अधिकाऱ्यांना दिले आहे .
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments