वृत्तसंस्था:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाचा प्रतिबंध करणारी लस शोधणाऱ्या डॉक्टरांच्या टास्क फोर्ससोबत बैठक घेतली. या बैठकीत करोना व्हायरसची लस शोधण्याबाबत काय काय सुरु आहे याचा विस्तृत आढावाही पंतप्रधान यांनी घेतला. करोना व्हायरसविरोधातली लस शोधण्याचं काम कुठवर आलं आहे? तसंच काय काय निदानं आहेत आणि चाचण्या करण्यात आल्या आहेत याचाही आढावा घेतला.करोना व्हायरसच्या विरोधात लस शोधण्याच्या कामात भारतीय कंपन्यानी पुढाकार घेतला आहे. सध्या करोनाविरोधात लढण्यासाठी विविध प्रकारच्या ३० लसींवर काम सुरु आहे तर काही लसी या चाचणीच्या टप्प्यात आहेत अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comentários