top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

कोरोनासंसर्गाची भयावह स्थिती असतानाही पीपीई किटफेकले रस्त्यावर , कारवाईची मागणी








चाळीसगाव : महेंद्र सूर्यवंशी :- एकीकडे संपूर्ण जग कोरोनाच्या दहशतीखाली असताना शहरातील कोविड केअर सेंटर जवळ असलेल्या बाप्पा पॉईंट जवळील रस्त्यावर कोरोनाच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे पीपीई किट सत्यावर फेकल्याने खळबळ उडाली असुन नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे . पीपीई किट उघड्यावर टाकणाऱ्या अज्ञातांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे . चाळीसगाव तालुक्याच्या चोहोबाजुला कोरोना संसर्गचे रूग्ण सापडत असतानाही चाळीसगावात मात्र , कोरोनाचा एकही रूग्ण आढळलेला नव्हता मात्र , गेल्या काही दिवसांपूर्व कोरोनाने तालुक्यात शिरकाव केला आहे . शहरालगत असलेल्या टाकळी प्र.चा. येथील एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली आहे तर सायगाव येथील एक जण नांदगावमध्ये कोरोना बाधित झाला.आहे . तालुक्यातील जामडीची महिला देखील भडगावमध्ये कोरोनाबाधित झाली . त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले असून काहींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत . तालुक्यात एकच रुग्ण आढळल्याने अद्यापतरी तालुक्यातील परिस्थिती आटोक्यात आहे . कोरोनच्या प्राथमिक उपचारासाठी व कारंटाईन करण्यासाठी शहरात अंधशाळेतील मुलींच्या स

वस्तीगृहात कोविड केअर सेंटरची स्थापना करण्यात आली आहे . त्यात कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्याच्या संशयावरून जळपास १५ ते २० जण अद्यापही क्वारंटाईन करण्यात आले आहेत , त्यातील एका वृद्धाचा अचानक मृत्यू झाला होता .अशी भयावह परिस्थिती असतानाही पीपीई किट शहरातील बाप्पा पॉइंट जवळ उघडयावर फेकण्यात आल्याने या भागातील नागरीकांमध्ये भितीचे वातारण निर्माण झाले आहे .

129 views0 comments

Comentários


bottom of page