वृत्तसंस्था नाशिक,महाराष्ट्राला कोरोना व्हायरसचा विळखा पडला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. नाशिकमध्ये कोरोना झाल्याच्या भीतीमुळे एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.नाशिक जिल्ह्यातील नाशिकरोड येथील चेहडी पंम्पिंग स्टेशन जवळ ही घटना घडली आहे. 31 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. या तरुणाला गेल्या काही दिवसांपासून सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी आपल्या परिसरातील डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली. पण, तरीही सर्दी आणि खोकला काही कमी होत नव्हता, त्यामुळे डॉक्टरांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन तपासणी करण्यास सांगितले होते.मात्र, आपल्याला कोरोनाची लागण तर झाली नाही ना, या भीतीने तरुणाला ग्रासले होते. त्यातूनच त्याने आज राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी या तरुणाने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या सुसाईड नोटमध्ये कोरोना झाल्याची भीती व्यक्त करत आपण आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे.या तरुणाने आत्महत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस अधिक तपास करत आहे.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comentarios