top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

कोरोनाचे आज १६०६ नवीन रुग्ण; राज्यात एकूण रुग्ण ३० हजार ७०६ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती




वृत्तसंस्था:- मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३० हजार ७०६ झाली आहे. आज  १६०६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज  ५२४ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७०८८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २२ हजार ४७९ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ६१ हजार ७८३ नमुन्यांपैकी २ लाख ३१ हजार ०७१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३० हजार ७०६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३ लाख ३४ हजार ५५८ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १७ हजार ४८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ६७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. त्यापैकी २२ मृत्यू हे गेल्या २४ तासातील आहेत तर उर्वरित मृत्यू हे १४ एप्रिल ते १४ मे या कालावधीतील आहेत. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील ४१,  पुण्यात ७, ठाणे शहरात ७, औरंगाबाद शहरात ५, जळगावमध्ये  ३, मीरा भाईंदरमध्ये २, नाशिक शहरात १ तर  सोलापूर शहरामध्ये  १ मृत्यू झाला आहे.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४७ पुरुष तर २० महिला आहेत. आज झालेल्या ६७ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३८ रुग्ण आहेत तर २५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ६७ रुग्णांपैकी ४४ जणांमध्ये (६६ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका:  १८,५५५ (६९६)

ठाणे: २०५ (३)

ठाणे मनपा: १४१६ (१८)

नवी मुंबई मनपा: १२८२ (१४)

कल्याण डोंबिवली मनपा: ५०२ (६)

उल्हासनगर मनपा: १००

भिवंडी निजामपूर मनपा: ४६ (२)

मीरा भाईंदर मनपा: २८३ (४)

पालघर: ५० (२)

वसई विरार मनपा: ३४० (११)

रायगड: २१८ (२)

पनवेल मनपा: १९६ (१०)

*ठाणे मंडळ एकूण: २३,२०९ (७६८)*

नाशिक: १०२

नाशिक मनपा: ६६ (१)

मालेगाव मनपा:  ६६७ (३४)

अहमदनगर: ५६ (३)

अहमदनगर मनपा: १६

धुळे: १० (३)

धुळे मनपा: ६७ (५)

जळगाव: १९३ (२६)

जळगाव मनपा: ५७ (४)

नंदूरबार: २२ (२)

नाशिक मंडळ एकूण: १२५६ (७८)

पुणे: १८९ (५)

पुणे मनपा: ३३०२ (१७९)

पिंपरी चिंचवड मनपा: १५६ (४)

सोलापूर: ९ (१)

सोलापूर मनपा: ३६२ (२१)

सातारा: १३१ (२)

पुणे मंडळ एकूण: ४१४९ (२१२)

कोल्हापूर: २१ (१)

कोल्हापूर मनपा: ६

सांगली: ३८

सांगली मिरज कुपवाड मनपा: ७ (१)

सिंधुदुर्ग: ७

रत्नागिरी: ९१ (३)

कोल्हापूर मंडळ एकूण: १७३ (५)

औरंगाबाद:९७

औरंगाबाद मनपा: ७७६ (२५)

जालना: २१

हिंगोली: ६६

परभणी: ५ (१)

परभणी मनपा: १

औरंगाबाद मंडळ एकूण: ९६६ (२६)

लातूर: ३३ (१)

लातूर मनपा: ०

उस्मानाबाद: ७

बीड: १

नांदेड: ५

नांदेड मनपा: ५४ (४)

लातूर मंडळ एकूण: १०१ (५)

अकोला: १९ (१)

अकोला मनपा: २१७ (१३)

अमरावती: ६ (२)

अमरावती मनपा: ९६ (११)

यवतमाळ: ९९

बुलढाणा: २६ (१)

वाशिम: ३

अकोला मंडळ एकूण: ४६६ (२८)

नागपूर: २

नागपूर मनपा: ३५० (२)

वर्धा: २ (१)

भंडारा: १

गोंदिया: १

चंद्रपूर: १

चंद्रपूर मनपा: ४

गडचिरोली: ०

नागपूर मंडळ एकूण: ३६१ (३)

इतर राज्ये: ४१ (१०)

एकूण: ३० हजार ७०६ (११३५)


(टीप – आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २३६ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)


राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १५१६ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १४ हजार ४३४ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ६०.९३  लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.



3 views0 comments

Kommentare


bottom of page