सिन्नर-शिर्डी महामार्गावर देवपूर फाटा येथे आज पहाटे फॉर्च्यूनर कार व झेन कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी रवींद्र जाधव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.मयत रविंद्र संपत जाधव हे नाशिक तालुक्यातील शिंदे येथील रहिवासी असून गेल्या चार वर्षांपासून वावी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. अपघातग्रस्त फॉर्च्युनर कारमध्ये मुंबईतील नगरसेवक व त्यांचे नातेवाईक असल्याचे समजते.या अपघातातील एका जखमीस नाशिकला उपचारासाठी हलविण्यात आले आहे. जाधव यांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या वृत्ताने शिंदे पळसे सह वावी परिसरात शोककळा पसरली आहे.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Комментарии