चाळीसगाव :(महेंद्र सूर्यवंश)दि .29 येथील पोलीस ग्राउंड शेजारी असलेल्या सह दुय्यम निबंधक ( वर्ग 2 ) कार्यालयातील कार्यालय प्रमुख एस.पी.बागुल यांच्या आदेशाने नाना निकम व मनोज चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे का ? महाशय बागुल हे एकीकडे स्वतः च्या सहीनिशी लेखी देतात की मनोज चव्हाण व नाना निकम या व्यक्ती कार्यालयात कार्यरत नाहीत आणि दुसरीकडे यांना खुर्च्या देतात या दोघांमार्फत एक ना अनेक अर्थपूर्ण कामे करून घेतांना दिसताहेत.असे दुटप्पी धोरण अवलंबून बागूल साहेबांनी भ्रष्ट्राचार हाच शिष्ट्राचार असल्याचा संदेश जनतेला दिला आहे . शहरासह , तालुक्यातून शेती , प्लॉट खरेदी विक्रीसाठी नागरिक या कार्यालयात येतात.यात धनदांडगे , बिल्डर , उद्योजक लोकांना रांगेत उभे राहून वाट पाहण्याची गरज नाही,यांचे काम विनाविलंब व तात्काळ केले जाते व सर्वसामान्य व्यक्तीचा मानसिक,शारीरिक व आर्थीक छळ केला जातो.खरेदीसाठी लवकर नंबर लावणे,खरेदीच्या नकला काढणे यासारख्या कामांसाठी शासकीय फी व्यतिरिक्त नियमबाह्य अव्वाच्या सव्वा पैसे उकळून रोजच नागरिकांना ओरबाडून त्यांचा आर्थीक छळ केला जात असल्याचे समजते. या कार्यालयातील स्वयंघोषित राहू व केतू मुळे या कार्यालयाला ग्रहण लागले आहे.नागरिकांना हेरून " माझे , साहेबांचे " अशी सबब दाखवत रोजच नागरिकांच्या खिशावर भरदिवसा डल्ला मागण्याचा सपाटा सुरू आहे .या सर्व हेराफेरी व सोयीस्कर जांगडंगुत्त्याला जबाबदार असलेले कार्यालय प्रमुख यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही व्हावी अशी मागणी जनातेमधून जोर धरत आहे. येथील राहू व केतू (स्वयंसेवक) हे काही उच्च विद्याविभूषित , तंत्रज्ञ , किमान कौशल्य अथवा राज्य / राष्ट्रीय पुरस्कार विजेते नाहीत . तसेच हे जनसेवेसाठी काही सेवाभावी उपक्रम चालवितात असेही नाही .अकलेपेक्षा कमाई जास्त मिळत असल्याने यांचे शौक व राहणीमान उच्चभ्रू असल्याचे कळते .घाम न गाळता काही सेकंदांच्या आत बक्कळ व भरमसाठ पैसा मिळाल्याने मनुष्य नाना उद्योग करतो .काम लोकलचे असूनही यांचा रुबाब मात्र मालकाप्रमाणे असल्याने अल्पावधीतच यांनी एखाद्या श्रमजीवी बागाइतदाराला लाजवेल इतकी मायापुंजी जमविल्याचे समजते . या कार्यालयात C.C.T.V. कॅमेरे लावण्यात यावे अशा विषयाचे वरिष्ठांना निवेदन देऊनही आजपावेतो येथे कॅमेरे बसविण्यात आले नाही.बागुल साहेबांनी बेकायदा बक्कळ पैसा जमा करण्यासाठी तर या " वसुलीभाईंची " नियुक्ती केली नाही ? असा सवाल जनतेच्या मनात घर करून बसला आहे . या राहू व केतूची हकालपट्टी करायची कि शिस्तभंगाच्या कार्यवाहिला सामोरे जायचे , हे मात्र साहेबानी पहायचे ?
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Opmerkingen