वृत्तसंस्था:-राज्यात कोरोनानं अक्षरश: थैमान घातलं आहे. 3 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. दिवसेंदिवस हा आकडा वेगानं वाढत आहे. पिंपरी-चिंचवड आणि पालघरमधून पुन्हा काही नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. 4 वर्षांच्या चिमुकलीसह 2 महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. पिंपरीतील कोरोनाग्रस्तांची संख्या 30 वर पोहोचली आहे. उपचार घेणाऱ्या सर्वांची प्रकृती स्थिर असून, नागरिकांनी आपल्या आरोग्यासाठी घरातच बसून राहावं आणि लॉकडाऊनचं पालन करण्याचं आवाहन पालिका प्रशासनाकडून कऱण्यात आलं आहे.तर दुसरीकडे पालघर ग्रामीण भागात कोरोनाचे 10 नवीन रुग्ण आढळल्यानं खळबळ उडाली आहे. गेल्या दोन आठवड्यापासून पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात करोना संसर्गाच्या एकही नवीन रुग्ण आढळला नसताना काल रात्री आलेल्या अहवालांमध्ये जिल्ह्या ग्रामीण भागात 10 नवीन रुग्ण वाढले आहेत. त्यामध्ये पालघर तालुक्यात आठ नागरिकांना तर डहाणू तालुक्यात वैद्यकीय सेवेत असलेल्या करोना संसर्ग झाल्याचे उघडकीस आले आहे.राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. राज्यात बुधवारी 232 रुग्णांची भर पडली तर 9 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 2916 झाली असून 187 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 52000 तपासणी झाल्या असून त्यातील 48 हजार 198 तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सगळ्यात जास्त रुग्ण हे मुंबई आणि ठाण्यात आहेत. राज्यात 5 हजार 394 सर्व्हेक्षण पथकं काम करत असून त्यांनी आत्तापर्यंत 20 लाख लोकांचा सर्व्हे केल्याची माहितीही देण्यात आली आहे.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments