शेतकऱ्यांसाठी अनपेक्षित धनाची पेटी ठरलेला कांदा आता सामान्य ग्राहकांच्या डोळ्यांतून अश्रू आणत आहे. आधी हॉटेलांतून, नंतर भज्यांमधून आणि आता भाजीमधूनही कांदा हद्दपार होतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून दराचे नवनवीन विक्रम करणाऱ्या उन्हाळ कांद्याने उमराणे बाजार समितीत तब्बल साडेबारा हजारांचा आजवरचा विक्रमी दर नोंदवला असून, किरकोळ बाजारात ग्राहकांना प्रतिकिलोला सव्वाशे रुपये मोजावे लागत आहेत. काही महिन्यांपासून जनसामान्यांना रडविणाऱ्या कांद्याने सोमवारी (दि. २) तब्बल दोन हजार रुपयांची विक्रमी उसळी घेतली. लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला तब्बल नऊ वर्षांनी प्रतिक्विंटलला ८,६५५ रुपयांचा उच्चांकी दर मिळाला. यापूर्वी डिसेंबर २०१० मध्ये लाल कांद्याला ६,२९९ रुपये प्रतिक्विंटल असा उच्चांकी भाव मिळाला होता. सोमवारी उमराणे बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटलला आजवरचा सर्वोच्च १२ हजार ५०१ रुपयांचा दर मिळाला. कळवण येथेही ११ हजारांचा भाव मिळाला.उत्पादन कमी आणि आवकही घटल्याने मागील तीन दिवसांत बाजार समितीत कांद्याचे दर सरासरी दीड ते दोन हजारांनी वाढले आहेत. परिणामी, किरकोळ बाजारातील दर किलोला सव्वाशे रुपयांपर्यंत पोचल्याने सामान्यांच्या तोंडचे पाणी डोळ्यांत तरळले आहे.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments