मुंबई :- तुझ माझं ब्रेक अप’ फेम अभिनेत्री केतकी चितळे हीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी भेट घेतली. हिंदी भाषेत बोलल्याने सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आल्याच्या मुद्यावरून तिने मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर केले.शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, अभिनेते सुशांत शेलार, दिगंबर नाईक, प्रकाश वालावलकर यांच्या शिष्टमंडळास तिने मुख्यमंत्र्यांबरोबरच विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांची भेट घेतली.संबंधित प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे केतकीने एक निवेदनही सादर केले. याच निवेदनाच्या आधारे मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावरून खोट्या अकाउंटच्या माध्यमातून अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांना अटक करण्याची सूचना गुन्हे अन्वेषण शाखेतील अधिकाऱ्यांना केली आहे. यासंदर्भातील वृत्त खाजगी वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments