top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

एसटी महामंडळाच्या ताफ्यात ‘शिवाई’, एकदा चार्ज केल्यानंतर गाठणार ३०० किमीचा पल्ला


(वृत्तसंस्था)देशातील पहिली विद्युत बस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या हस्ते या बसचं लोकार्पण करण्यात आलं. ही बससेवा शिवाई नावाने ओळखली जाईल. एकदा चार्ज केल्यानंतर ही बस किमान ३०० किमीचा पल्ला गाठेल. ही बस दोन शहरांमधील वाहतूक सेवेसाठी चालवली जाणार आहे. एसटीमध्ये लवकरच अशा सुमारे १५० बस दाखल होत आहेत.यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी, "अशा पर्यावरणस्नेही बस एसटी महामंडळात दाखल करण्याची सुरुवात करून रावते यांनी एसटीचा कायापालट करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे," असं सांगितलं. ‘शिवनेरी, शिवशाही आणि विठाई बसच्या यशानंतर विद्युत बस ही ‘शिवाई’ नावाने ओळखली जाईल’, अशी घोषणा रावते यांनी केली.मुंबई सेंट्रल येथील एसटी महामंडळाच्या मुख्यालयाची इमारत, बसस्थानक व आगाराचीही पुनर्बाधणी करण्यात येणार असून या कामाचे भूमिपूजनही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. या ठिकाणी ४९ मजली इमारत उभारण्यात येणार असून त्यातील आठव्या मजल्यापर्यंत वाहनतळ असेल. ९ ते १४ व्या मजल्यापर्यंत एसटी महामंडळाचे मुख्यालय असेल. १५ ते ४९ वे मजले सरकारच्या विविध विभागांना भाडय़ाने देण्याचा प्रस्ताव आहे. त्यातून महामंडळास प्रति महिना अंदाजे १६.१७ कोटी उत्पन्न मिळू शकेल. आरटीओ आणि एसटीमध्ये सुमारे ३८ हजार जणांना थेट नोकऱ्या देण्यात आल्या असून १५ हजार जणांची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे, असे दिवाकर रावते यांनी सांगितले.

133 views0 comments

Comments


bottom of page