चोपडा :- उदय अग्निहोत्री ,
दिनांक १५ डिसेंबर रोजी श्री संत गजानन बहुउद्देशीय संस्था चोपडा संचलित औद्योगिक प्रशिक्षण केंद्र,वेले ता.चोपडा तर्फे संस्थेचे अध्यक्ष निसर्गप्रेमी मा.डॉ. संदिप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.चोपडा-धरणगाव रस्त्यालगत हे वृक्षारोपण पार पडले यात प्रामुख्याने निंब,सिसु,चिंच आदी देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले.संस्थेचे अध्यक्ष डॉ.संदिप पाटील यांना झाडांविषयी कमालीची आस्था व आवड असुन वेळोवेळी त्यांच्या कृतीतून दिसून येते.म्हणूनच संस्थेचे अध्यक्षांच्या वाढदिवसाला औ.प्र.केंद्र वेले येथील शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्याचे योजिले. यावेळी वनपरिमंडळ अधिकारी विपुल पाटील,प्राचार्य दिव्यांक सावंत,सचिन पाटील, भुषण देशमुख,आशुतोष पाटील, राहुल सैंदाणे व सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.
Σχόλια