top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

एमएचटी - सीईटीमध्ये आता दोन स्वतंत्र परीक्षा


(वृतसंस्था) राज्यात वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेशांसाठी आता स्वतंत्र परीक्षा घेतल्या जाणार आहेत . एप्रिलमध्ये होणाऱ्या एमएचटी सीईटीमध्ये पीसीबी आणि पीसीएम अशा दोन गटांच्या स्वतंत्र परीक्षा होणार आहेत . राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे ( सीईटी ) आयुक्त संदीप कदम यांनी ही माहिती दिली . _ एमएचटी - सीईटीतील गुणांच्या आधारेच अभियांत्रिकी औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिले जातात . सीईटीमध्ये असलेली भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र , गणित आणि जीवशास्त्र ( पीसीएमबी ) ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे त्याऐवजी आता पीसीबी आणि पीसीएम अशा गटांच्या स्वतंत्र परीक्षा होतील . गेल्या वर्षीपर्यंत या परीक्षेच्या निकालात पर्सेटाइल या पद्धतीचा अवलंब केला जात होता . मात्र , निकालानंतर त्या संदर्भात अनेक तक्रारी आल्या . त्यामुळे यंदा अभियांत्रिकी आणि वैद्यकीय या दोन्ही शाखांत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पीसीएमबी गटाची परीक्षा देण्याऐवजी पीसीबी आणि पीसीएम या गटांच्या स्वतंत्रपणे परीक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला . या दोन्ही गटांचा निकाल , गुणपत्रिका स्वतंत्र असतील . एमएचटी सीईटीसाठी आठ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे . १३ ते १७ एप्रिल आणि २० ते २३ एप्रिल या कालावधीत गटानुसार परीक्षा घेतली जाणार आहे . पीसीबी आणि पीसीएम यापैकी कोणत्या गटाची परीक्षा आधी होईल याचा निर्णय विद्यार्थिसंख्येनुसार जाहीर करण्यात येईल , असे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे .

5 views0 comments

Comments


bottom of page