top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

एप्रिलपासून विमान प्रवास महागणार; तिकिटांचे दर वाढणार


वृत्तसंस्था:- नवी दिल्लीः लागोपाठ वाढत्या महागाईमुळे विमान प्रवासही महागणार आहे. विमानांच्या तिकिटांबरोबरच एअरपोर्ट नेव्हिगेशन चार्ज (Airport Navigation Charge)सुद्धा वसूल केला जातो. या एअरपोर्ट नेव्हिगेशन चार्जेसमध्ये एप्रिलपासून 4 टक्के वाढ होऊ शकते, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. नागरी उड्डाण मंत्रालयानं यासाठी प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. CNBC आवाजच्या माहितीनुसार, एका रिपोर्टमध्ये वर्षं 2024-25पासून तिकिटांचे दर 4 टक्के वाढवण्याचा प्रस्ताव आहे. एअरपोर्टवर नेव्हिगेशनची सुविधा देण्यासाठी एअरपोर्ट नेव्हिगेशन सुविधा चार्ज वसूल केला जातो. प्रत्येक प्रवाशाकडून हा चार्ज प्रतिविमानानुसार घेतला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून या चार्जेसमध्ये कोणताही बदल झालेला नाही. परंतु आता त्या चार्जेसमध्ये वाढ करण्यात येणार आहे. मंत्रालयानं या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी पुढच्या आठवड्यात एक बैठकही बोलावली आहे. विमान कंपन्या ग्राहकांना कमी किमतीत तिकीट पुरवतात, असं गेल्या काही दिवसांपूर्वी नागरी उड्डयण मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले होते. परंतु जर असंच सुरू राहिलं, तर विमान कंपन्या बंद होतील, हीसुद्धा भीती सरकारला सतावते आहे. तसेच नागरी उड्डयण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी विमान तिकिटांचे दर वाढणार असल्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे. 

10 views0 comments

Comments


bottom of page