चाळीसगांव शहराच्या इतिहासात सर्वोच्च पदि विराजमान असणारी मा.न्यायमूर्ती अंबादास जोशी लोकआयुक्त यांची उपस्थिती.
वृत्तसंस्था :- एआर डिजिटल प्रेस मीडिया कौन्सिल आयोजित G20 शालेय प्रश्नमंजुषा व जागो ग्राहक जागो निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारोह राजपूत मंगल कार्यालय चाळीसगांव येथे दिमाखात साजरा झाला.समारोहाची सुरवात दीपप्रज्वलन व भारतमातेचे प्रतिमा पूजनाने झाली.एआर डिजिटल प्रेस मीडिया कौन्सिलचे संचालक राजेश ठोंबरे यांनी समारोहाचे अध्यक्ष मा.न्यायमूर्ती अंबादास जोशी सेवानिवृत्त न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय ,लोकायुक्त गोवा राज्य यांचे स्वागत भगवतगीता,स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले. त्याच प्रमाणे मा.तहसीलदार प्रशांत पाटील यांचे स्वागत भगवतगीता,स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले. या समारोहाचे मा.न्यायमूर्ती अंबादास जोशी सेवानिवृत्त न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय,लोकायुक्त गोवा राज्य यांनी सभागृहाला संबोधित करतांना वरील प्रशंसनीय उद्दगार काढले.आपल्या अत्यंत अभ्यासपूर्ण प्रभावी भाषणात संबोधताना म्हणाले की मा.पंतप्रधानांच्या दूरदृष्टीने संपूर्ण जगावर भारताची सकारात्मक आणि प्रगतशील भारत अशी प्रतिमा निर्माण करण्यासाठी आयोजित केलेल्या G20 शिखर बैठकीच्या माध्यमातून दिलेला संदेश जागतिक पातळीवर वेगळीच छाप निर्माण करून गेला आहे. या परिषदेचे विद्यार्थी दशेतच व्यवस्थित ज्ञान व्हावे ,वेगळा विचार रुजावा, आपल्या देशाप्रती स्वाभिमान उंचवावा, देशाच्या सर्वांगीण विकासात पडणारी दमदार पाऊले यांचे आकलन व्हावे, या उद्देशाने एआर डिजिटल प्रेस मीडिया कौन्सिलने स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नमंजूषा स्वरूपात हा विचार रुजवला या बद्दल परिषदेच्या संचालकांचे मनापासून अभिनंदन ही केले ,त्याच बरोबर तीनही जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या प्रशाकीय अधिकाऱ्यांचे, सहभागी शाळांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक ,शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे व पालकांचे विशेष कौतुक केले.समाजामध्ये या प्रकारचा देश हिताचा वेगळा विचार घेऊन आपआपल्या पातळीवर काम करणाऱ्या अशा व्यक्ती ,संस्था कार्यरत असतात त्यांचा शासन आणि प्रशासनाने जाणीव पूर्वक शोध घेऊन त्यांच्या या कार्यात कृतीशील सहभागी झाले पाहिजे,त्यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे असे ही प्रतिपादन केले .तसेच G20 शालेय प्रश्नमंजुषा स्पर्धा व जागो ग्राहक जागो ही ग्राहकाभिमुख स्पर्धा घेऊन समाजामध्ये हा विचार रुजवला याचा पुढील टप्पा G20 च्या दिमाखदार झालेल्या परिषदे नंतर जागतिक स्तरावर भारताचे अर्थकारण,समाजकारण आणि राजकारण यांचे बदलते स्वरूप नेमके काय असेल यावर पुढील स्पर्धेचे एआर डिजिटल प्रेस मीडिया कौन्सिलने आयोजन करावे असे ही सुचवले.
व्यासपीठावर उपस्थित मा.प्रशांत पाटील तहसीलदार यांनी देखील उपस्थित विद्यार्थी,पालक, गुरुजन आणि प्रतिष्ठित नागरिकांना आपल्या ओघवत्या शैलीत मार्गदर्शन केले. शालेय शिक्षण अभ्यासक्रमा व्यतिरिक्त अशा प्रकारच्या स्पर्धा विद्यार्थ्यांना वेगळा विचार करायला लावतात त्या अनुषंगाने अवांतर सकारात्मक वाचन, लेखन, चिंतन करण्याची संधी देतात यातूनच उद्याचा जबाबदार नागरिक घडत असतो. अशी स्पर्धा घेतल्या बद्दल आणि इतके सुंदर आयोजन केले बद्दल एआर डिजिटल प्रेस मीडिया कौन्सिलच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
मा.उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जाणीवपूर्वक दखल घेऊन शुभेच्छा पत्र पाठवले त्याचे वाचन प्रा.मनीषा सूर्यवंशी यांनी केले.
चाळीसगांवच्या इतिहासात या प्रकारच्या पारितोषिक वितरण समारोहासाठी गोवा राज्याचे लोकायुक्त या राज्यातील सर्वोच्च पदावरील व्यक्ती दोन दीवसाचा वेळ काडून चाळीसगांव शहरातील स्वयंदीप ,के.की.मुस कलादालन ,शेठ नारायण बंकट वाचनालय अशा सामाजिक क्षेत्रात प्रभावी कार्य करणाऱ्या अनेक व्यक्ती आणि संस्थांना जाणीवपूर्वक भेटी देऊन प्रोत्साहन देतात हे देखील त्यांचे वेगळेपण अधोरेखित झाले.
पारितोषिक विजेत्या जळगांव ,धुळे, छत्रपती संभाजीनगर या तीनही जिल्ह्यातील पारितोषिक विजेत्यांना सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र, रोख रक्कम व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.यात स्वराली जोशी संभाजीनगर या विद्यार्थीनें पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना तर्फे मनोगत व्यक्त करतांना सांगितले की एआर डीजीटल प्रेस मीडिया कौन्सिल ने G20 च्या निमित्ताने प्रश्नमंजुषा स्पर्धा घेऊन आम्हाला नुसती सहभागी होण्याची संधीच दिली नाही तर एक नवा विचार दिला अशाच वेगवेगळ्या अभिनव स्पर्धांचे यापुढेही परिषदेने आयोजन करावे, त्यात आम्हाला सहभागी होण्याची संधी द्यावी असे प्रतिपादन केले.व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.न्यायमूर्ती अंबादास जोशी सेवानिवृत्त न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय,लोकायुक्त गोवा राज्य ,मा.प्रशांत पाटील तहसीलदार,मा.दिनेश गुप्ता नॅशनल चीफ क्राईम अँड करपशन कंट्रोल असोसिएशन,मा.कीसनराव जोर्वेकर जेष्ठ पत्रकार,योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे,आधार महाले रोटरी अध्यक्ष,रोटरी सदस्य लालचंद बजाज, रवींद्र शिरोडे,निलेश गुप्ता,राजेंद्र छाजेड,मीनाक्षीताई निकम उपस्थित होते.या देखण्या सोहळ्याचे प्रभावी सूत्र संचालन श्री विजय गर्गे व मनीषा सूर्यवंशी यांनी केले
मा.न्यायमूर्ती अंबादास जोशी सेवानिवृत्त न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय,लोकायुक्त गोवा राज्य यांचा परिचय आणि प्रस्तावना मा.संचालक राजेश ठोंबरे यांनी केले.या कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठित मान्यवर,विविध संस्थांचे पदाधिकारी ,व्यापारी ,पत्रकार उपस्थित होते.समारोहाच्या यशस्वीते साठी प्रकल्प प्रमुख आकाश आमले,वैभव बाबर, डिजिटल मीडिया विंग प्रमुख गणेश चौधरी,तक्षक ठोंबरे, उदय अग्निहोत्री , उर्वराज गायकवाड ,हर्षल गवळी,यशवंत चित्ते,सचिन चौधरी,ताराचंद गुप्ता,विशाल राणा ,विशाल पाटील,श्याम पाटील,रवी मोरे,सुरेश वेळीस निलेश काकडे, तसेच न्यायालयीन कर्मचारी श्री.हेमराज पाटील,श्री.दीपक पवार,श्री.किशोर पाटील,श्री.अमित गेडाम आणि श्री.इंजि.अनिल बैसाने उपविभागीय अभियंता सा.ब उपविभाग चाळीसगांव.श्री.इंजि.हेमंत चौकशी शाखा अभियंता सा.ब.उपविभाग श्री.योगेश पाटील व्यवस्थापक शासकीय विश्रामगृह चाळीसगांव. श्री.संदीप पाटील पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन चाळीसगांव तसेच श्री.सतीश पाटील API महाराष्ट्र राज्य महामार्ग चाळीसगांव व त्यांचे सहकारी यांनी सहकार्य केले.समारोहाचे आभार प्रदर्शन श्री.अश्विन खैरनार संचालक यांनी केले.
Comments