जळगांव :- उदय अग्निहोत्री,
ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी (नाना) स्मृती प्रित्यर्थ कै.अरुण भार्गवे पुरस्कृत उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार
24डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनी नासिक विभागातून ग्राहक चळवळीला समर्पित होऊन ग्राहकांच्या समस्या, तक्रारी,प्रबोधन, करण्यात सक्रिय राहून कार्य करणाऱ्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र च्या सक्रिय साधकास गौरविण्यात येणार आहे.
नासिक विभागातील अहमदनगर,नंदूरबार, धुळे, नासिक व जळगाव या पाचही जिल्हयातील सर्व साधक बंधुभगिनींना आवाहन करण्यात येते की, आपल्या जिल्हाध्यक्ष यांचे कडे आपण वर्षभरात केलेल्या कार्याचा प्रस्ताव दिनांक 7 डिसेंबर 2022 पर्यन्त पाठवावा असे आवाहन विभागअध्यक्ष डाॅ.अजय सोनावणे व विभाग संघटक प्रा. संजय शुक्ल यांनी केले आहे . प्रत्येक जिल्हा कार्यकारणी कडून आलेल्या प्रस्तावातुन एका नावाची शिफारस .विभागाकडे करण्यात येईल . आणि विभागाकडुन आलेल्या पाच नावांपैकी राज्य कार्यकारीणीकडुन अंतिम एका नावाची निवड होवुन त्याला राज्याच्याकार्यकारीणीची मान्यता मिळुन नासिक विभागीय उत्कृष्ठ ग्राहक कार्यकर्ता पुरस्कार राष्ट्रीय ग्राहक दिनी 24 डिसेंबर रोजी समारंभपुर्वक प्रदान केला जाईल
या उपक्रमातुन *नासिक विभागातील एका साधकाची निवड होऊन सन्मानित करण्यात येणार असल्याने या त देण्यात येणार्या
पुरस्काराचे स्वरूप:___
स्मृती चिन्ह,मानपत्र, ग्राहकाभिमुख मासिकाचा वार्षिक वर्गणीदार . असे असणार आहे. तरी या जास्तीत जास्त साधक बंधु भगिनींनी प्रतिसाद देतील अशी आशा विभागाचे अध्यक्ष यांनी व्यक्त केली .
Comments