top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

इयत्ता पाचवी , आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा १६ फेब्रुवारीला


औरंगाबाद (वृत्तसंस्था): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद , पुणे यांच्यातर्फे इयत्ता पाचवीसाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता आठवीसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा १६ फेब्रुवारी २०२० रोजी आयोजित करण्यात आली आहे , असे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांच्यातर्फे कळविण्यात आले आहे . शासनमान्य शाळांमधून २०१९ - २० या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीत शिष्यवृत्ती परीक्षा , विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेकरिता शाळा माहिती प्रपत्र , ऑनलाइन शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यांची ऑनलाइन आवेदनपत्र परिषदेच्या www . mscepune . in व https : / / puppss . mscescholarshipexam . in या संकेतस्थळावर १ ऑक्टोबरपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत . विलंब शुल्कासह प्रवेशित होण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत , अतिविलंब शुल्कासह प्रवेश घेण्यासाठी एक ते १५ डिसेंबरपर्यंत तर अतिविशेष विलंब शुल्कासह प्रवेशित होण्यासाठी १६ ते ३१ डिसेंबरपर्यंत मुदत असणार आहे . ३१ डिसेंबरनंतर कोणताही ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नसल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे . महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये १६ फेब्रुवारी २०२० रोजी एकाच वेळी परीक्षा घेण्यात येईल , असेही पुणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे .

77 views0 comments

Comments


bottom of page