मुंबई-(वृत्तसंस्था) मुंबई ते पुणे दरम्यान इंटरसिटी एक्स्प्रेसने प्रवास करताना आता तुमचा जवळपास पाऊण तासांचा वेळ वाचणार आहे. इंटरसिटी एक्स्प्रसेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून शुक्रवारपासून म्हणजेच ३१ मे पासून एक्स्प्रेस नव्या वेळापत्रकानुसार धावणार आहे. या नव्या वेळापत्रकानुसार इंटरसिटी एक्स्प्रेस फक्त २ तास ३० मिनिटांत आपला प्रवास पुर्ण करणार आहे. याआधी इंटरसिटीला मुंबई ते पुणे प्रवासासाठी ३ तास २० मिनिटांचा वेळ लागत होता.याचं मुख्य कारण म्हणजे नुकतीच इंटरसिटी एक्स्प्रेसला पूश अॅण्ड पूलचे डबल इंजिन लावून चाचणी घेण्यात आली होती. ही चाचणी यशस्वी झाली असल्या कारणामुळेच सात दिवसांसाठी चाचणी तत्त्वावर इंटरसिटी नव्या वेळापत्रकानुसार धावणार आहे. ३१ मे ते ६ जून दरम्यान इंटरसिटी नव्या वेळापत्रकानुसार धावणार आहे. यादरम्यान जर कोणतीही अडचण न येता इंटरसिटी वेळापत्रकानुसार धावली आणि सर्व काही सुरळीत चाललं तर हेच वेळापत्रक कायम ठेवलं जाणार आहे.मुंबई ते पुणे एकूण १९२ किमीचं अंतर आहे. आता नव्या वेळापत्रकानुसार, ३१ मेपासून सीएसएमटीवरुन ६.४० वाजता सुटणारी इंटरसिटी ६.४५ वाजता सुटणार असून पुण्यात ९.४५ ऐवजी ९.२० वाजता पोहोचेल. तर पुण्याहून संध्याकाळी ५.५५ वाजता सुटणारी गाडी ६.३० वाजता सुटणार आहे. ही गाडी ९.०५ ला सीएसएमटीला पोहोचेल.अशी सूत्रांकडून माहिती मिळाली.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments